इतर

राजूर येथेअमली पदार्थ विरोधी व नशा मुक्त भारत अभियान “


राजूर प्रतिनिधी

: माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांनी “भारत हा तरुणांचा देश आहे” असे म्हटले होते. “तरुणांची आजची शक्ती विधायक मार्गाने वळविल्यास भारत हा जगातील सर्वात मोठा देश होऊ शकतो. तरुणांनी अमली पदार्थ व नशेपासून दूर राहायला हवे. तरुणांच्या शक्तीवरच देशाचा विकास शक्य आहे ” असे विचार प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी मांडले.ते एम.एन.देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात आयोजित केलेल्या “अमली पदार्थ विरोधी व नशा मुक्त भारत अभियान ” या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आर. सी. मूठे (राष्ट्रीय छात्र सेना कार्यक्रमाधिकारी) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर. आर. सोनवणे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना नशा व व्यसनापासून दूर राहण्याची शपथ प्रा. रोहित मुठे यांनी दिली.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. गवळी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button