सामाजिक

एबीएच डेव्हलपर्सच्या सहकार्याने ठक्कर बाजार चौकाला मिळणार नवी झळाळी!

नाशकातील रोटरी चौकाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न


नाशिक : गेल्या ७७ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या येथील रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठक्कर बाजार समोरील चौकाचे लवकरच सुशोभीकरण करण्यात येणार आहे. सुशोभीकरण करण्यात येणाऱ्या या जागेचे आज रोटरी क्लबचे प्रांतपाल आनंद झुनझुवाला,  एबीएच डेव्हलपर्सचे अटल व डी. जे. हंसवाणी, इलेक्त गव्हर्नर आशा वेणुगोपाल, माजी प्रांतपाल दादा देशमुख, रोटरी क्लबचे अध्यक्ष सीए. प्रफुल बरडीया, सचिव ओमप्रकाश रावत आदींच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले. काही दिवसांतच ठक्कर बाजार चौकाला नवी झळाळी मिळणार असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
नाशिक शहरातील प्रख्यात एबीएच डेव्हलपर्स यांच्या सहकार्यातून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यावेळी सलीम बटाडा, आर्किटेक केदार देवी, विजय दिनानी, ऋषिकेश समनवार, शशिकांत पारख,  अनिल सुकेनकर, मंथ लीडर अमर शाह, एकता अग्रवाल, शिल्पा पारख, डॉ. श्रिया कुलकर्णी, मंगेश अपशंकर, राज तलरेजा, डॉ. गौरव सामनेरकर, वृषाली ब्राह्मणकर, डॉ. धनंजय माने, सतीश मंडोरा, दमयंती बरडीया, हेमराज राजपूत, संतोष साबळे, विजय दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. या चौकाचे सुशोभीकरण आगळ्या वेगळ्या प्रकारे करण्यात येणार असून येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या चौकाची वेगळी ओळख होणार आहे. नाशिक महानगरपालिका अंतर्गत शहरातील वेगवेगळ्या चौकाच्या सुशोभीकरण मोहिमेत आता रोटरी क्लब ऑफ नाशिकनेही सामाजिक जबाबदारी उचलली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button