रायगड जिल्हा मनसे संपर्क कार्यालयात ध्वजारोहण समारोह संपन्न

(हेमंत सुरेश देशमुख)
उरण रायगड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यालय उरणच्या वतीने १५ ॲागस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी साजरा करण्यात आला
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ध्वजारोहण समारोहाचे आयोजन करण्यात आले होते,त्या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड भूषण सौ. संगिता ढेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
त्या प्रसंगी मनसे द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील,मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश तांडेल,मनसे शहर उपाध्यक्ष उमेश वैवडे, हितेश साळुंखे,शहर चिटणीस दिनेश हळदणकर,विभाग अध्यक्ष सुभाष पाटील,सचिन ढेरे,दीपक प्रसादे, योगेश म्हात्रे,साहिल प्रसादे, अमर ठाकूर,राजेश सरफरे,ओम शेरे,उल्हास गायकवाड, दीपक देवरुखकर ,महिला सेनेच्या शहर अध्यक्षा सौ.सुप्रिया सरफरे,सौ.कविता म्हात्रे,सौ.पूजा प्रसादे आदी महिला भगिनी व मनसैनिक उपस्थित होते.
