बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली येथे सावित्रीमाई फुले यांची १९४ वी जयंती साजरी

डॉ. शाम जाधव
बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली च्या वतीने माता सावित्रीमाई फुले यांची १९४ वी जयंती आणि माता रमाई आंबेडकर उद्यान देखभाल व दुरुस्ती समिती यांचा सत्कार दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी आयोजित केलेला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.शाहीन मुल्ला ह्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे धूप दीप आणि पुष्प यांनी विहाराचे अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप, सह खजिनदार जगन्नाथ आठवले प्रमुख पाहुण्या प्रा शाहीन मुल्ला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेश दुधगावकर, माजी नगर सदस्य ,भीमा कोरेगाव शौर्यतम उभारणीचे शिल्पकार जगन्नाथ ठोकळे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले . त्रिसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर प्रास्ताविक सहखजिनदार जगन्नाथ आठवले यांनी केले.

विहाराच्या संचालिका अवंतिका वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय आपल्या चांगल्या शैली मध्ये करून दिला.
त्यानंतर भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाचे शिल्पकार संस्थापक अध्यक्ष ,आदरणीय जगन्नाथ ढोकळे तसेच माता रमाई उद्यान देखभाल व दुरुस्ती समितीच्या अध्यक्षा आणि इतर सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.