इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२४/०२/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०६ शके १९४५
दिनांक :- २५/०२/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २०:३६,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति २५:२४,
योग :- सुकर्मा समाप्ति १४:२८,
करण :- बालव समाप्ति ०७:१८,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:०५ ते ०६:३२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:४७ ते ११:१५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:१५ ते १२:४२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा ४ दिवस, इष्टि,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०६ शके १९४५
दिनांक = २५/०२/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
जवळचा प्रवास कराल. हातातील कामाला गती येईल. मानसिक चांचल्या जाणवेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. मनाची संवेदनशीलता दाखवाल.

वृषभ
कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. सर्वांशी गोडीने वागाल. अपचनाचा त्रास जाणवेल. योग्य संधीची वाट पहावी. मानसिक स्थैर्य जपावे.

मिथुन
एकाचवेळी अनेक कामात हात घालू नका. जोडीदाराच्या विचारांचे कौतुक कराल. मनातील निराशा दूर सारावी. चुकीच्या विचारांना मनात थारा देवू नका.

कर्क
जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. नसते साहस करायला जाऊ नका. जुगारातून नुकसान होण्याची शक्यता आहे. चोरांपासून सावध राहावे.

सिंह
कौटुंबिक प्रश्न मार्गी लावावेत. तुमचे संपर्क अधिक दृढ होतील. कुशलतेने व्यवहार करावा. मनातून तिरस्कार काढून टाकावा. व्यापारात प्रगती करता येईल.

कन्या
भावंडांशी मतभेद संभवतात. हातातील अधिकार योग्यवेळी वापरावेत. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ इजा संभवते. छुप्या शत्रूंवर विजय मिळवाल.

तूळ
आर्थिक व्यवहार जपून करावेत. मौल्यवान वस्तु जपून वापराव्यात. हित शत्रूंचा त्रास संभवतो. मत्सराला बळी पडू नका. कौटुंबिक शांतता जपावी.

वृश्चिक
उष्णतेचे त्रास संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा. उगाच कोणाशीही शत्रुत्व घ्यायला जाऊ नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल.

धनू
सामाजिक बांधीलकी जपावी लागेल. घरात जबाबदारीने वागाल. जुने प्रश्न पुन्हा उभे राहतील. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.

मकर
कामाचे गणित जुळवावे लागेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. काही बदल स्वीकारावे लागतील.

कुंभ
मनातील विचारांना आवर घालावी लागेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. स्मरणशक्तीचा चांगला उपयोग होईल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. योग्य तर्क बांधावा.

मीन
बढतीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कलेसाठी वेळ काढावा. सर्वांशी हसून-खेळून वागाल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button