अगस्ती शिक्षण संस्थेला माहिती अधिकाराचे वावडे !

अगस्ती शिक्षण संस्थेत अनेक नेमणुका
संशयास्पद ..?
सुनील गीते
अकोले दि१५
ठराविक कुटुंबाची मक्तेदारी बनलेल्या अगस्ती शिक्षण संस्थेला माहिती अधिकाराचे वावडे आहे एका सामाजिक कार्यकर्त्याने या संस्थेकडे काही माहिती माहिती अधिकारात मागितली असता या कार्यकर्त्याला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ करत वाटाण्याच्या अक्षदा दावल्या
शिक्षण संस्था या धर्मदाय संस्था असतात ती कुणाची खाजगी मालमत्ता नसते सामाजिक ,प्रामाणिक सेवेच्या हेतूने धर्मदाय संस्था चालविल्या जातात मात्र ही संस्था आपली खाजगी जहागिरी असल्या गत संस्था चालक वागतात संस्थेची माहिती जग जाहीर करणे, सार्वजनिक करणे हे संस्थेच्या व सामाजिक हिताचे असताना जाणीवपूर्वक ती दडवून ठेवणे हा देखील एक सामाजिक गुन्हा आहे मग अशा गुन्ह्याला धर्मदाय आयुक्तांनी देखील पाठीशी न घालता ती माहिती जाहीर रित्या सार्वजनिक का करू नये असा प्रश्न उपस्थित केला आहे या कार्यकर्त्याला माहिती देण्याचे टाळल्याने या संस्थे विषयीच्या कामकाजाबाबत संशय आणखी गडद होत आहे दडवून ठेवलेल्या या माहितीतुन अनेक गंभीर बाबी उघड होण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे
अकोले येथील श्री. सोमनाथ नानासाहेब नवले
यांनी माहिती अधिकारात ही माहिती .. श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी , मुंबई
द्वारा- अगस्ति विद्यालय, अकोले यांचे कडे दि १४/०९/२०२२रोजी मागितली होती त्यानुसार या संस्थेने त्यांना जा क४०/२०२२-२३ दि १४/०९/२०२२ रोजी संस्थेने अतिशय मुजोरपणे उत्तर दिले आहे
या उत्तरात संस्थेचे सचिवांनी सोमनाथ नवले यांना म्हटले आहे की आपला अर्ज संस्था व्यवस्थापनास दि.१४.०९.२०२२ रोजी हस्तपोहच
मिळाला. सदर अर्जाद्वारे आपण जी माहिती मागितलेली आहे त्या बाबत पुढील प्रमाणे
खुलासा करण्यात येत आहे.
आमच्या माहिती नुसार संस्था व्यवस्थापनास माहितीचा अधिकार हा कायदा लागू
होत नाही. त्यामुळे सदरचा अर्ज हा निकाली काढण्यात येत आहे. वरील कथनास बाधा न
येता तुम्हांस कळविण्यात येते की, तुम्ही माहिती अधिकार अंतर्गत जी माहिती मागितलेली
आहे, ती मोघम स्वरुपाची आहे. त्यामुळे देखील सदर माहिती देता येत नाही. आपण
मागितलेल्या माहितीपैकी काही माहिती ही वैयक्तिक स्वरुपाची आहे. ती माहिती तुम्हास
देता येत नाही. तसेच आपण मागितलेल्या माहितीतील काही माहितीचा एकमेकांशी
कोणताही संबंध असल्याचा दिसून येत नाही. त्याचप्रमाणे सदर माहिती आपणास दिल्यास
कोणतेही व्यापक लोकहित साधले जाणार नाही. तसेच ही माहिती उघड करण्याचा
कोणत्याही सार्वजनिक कामाशी किंवा हितसंबंधांशी कोणताही संबंध नाही, असे मत
झाल्याने माहिती न देताअर्ज नामंजूर करत असल्याचे मोघम उत्तर दिले आहे
