रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा उत्साहात

अध्यक्षपदी ओमप्रकाश रावत तर सचिवपदी शिल्पा पारख
नाशिक रोटरीचे कार्य कौतुकास्पद – कुलगुरू डॉ. कानिटकर
नाशिक : गेल्या ८० वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या रोटरी कल्ब ऑफ नाशिकचे कार्य कौतुकास्पद आहे. रोटरी क्लब राबवित असलेले उपक्रम पाहून मनस्वी आनंद वाटतो. देशाच्या विकासात १८ ते ३५ या वयोगटातील युवावर्ग अत्यंत महत्त्वाचा असून यावर्गासाठी रोटरीने सर्वाधिक उपक्रम राबवावे असे आवाहन केले. तसेच रोटरीच्या उपक्रमांसाठी पुढील काळात आवश्यक ते सहकार्य दिले जाईल असा विश्वास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ नाशिकचा पदग्रहण सोहळा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि प्रांतपाल राजिंदर खुराणा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष ओमप्रकाश रावत, मानद सचिव शिल्पा पारख, प्रकल्प सचिव हेमराज राजपूत यांनी पदभार स्वीकारला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कानिटकर बोलत होत्या.
यावेळी उपाध्यक्ष विजय दिनानी, खजिनदार श्रीविजय पंडित, यांच्यासह सर्वश्री विजय दीक्षित, विनायक देवधर, सुधीर जोशी, सीए रेखा पटवर्धन, निलेश सोनजे, वंदना सन्मनवार, डॉ. हितेश बुरड, उर्मी दिनानी, मकरंद चिंधडे, उन्मेष देशमुख, सीए सुजाता राजेबहादुर, डॉ. अनिता नेहेते, स्मिता अपशंकर, डॉ. सोनाली चिंधडे, रफिक होरा, दमयंती बरडीया, वैशाली रावत, अमित चौगुले, सुचिता महादेवकर, सोना सामनेरकर, रूपाली शहा, डॉ. गौरी कुलकर्णी, आदिती अग्रवाल यांनी पदग्रहण केले.
प्रांतपाल राजिंदर खुराणा यांनी बोलताना संस्थेच्या कार्यकारिणीत सर्वाधिक महिलांना मानाचे स्थान दिल्याबद्दल अध्यक्षांचे अभिनंदन केले. रोटरीतर्फे इंटरॅक्ट व रोटरॅक्ट अंतर्गत भावी पिढी नेतृत्व विकास आणि जवाबदार नागरीक बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच युवकांना नितीमूल्य, संस्कृती जपण्यासाठी विविध स्तरावर रोटरी उपक्रम राबवित असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सतत १८ तास पोहण्याचा विक्रम केल्याबद्दल तन्वी देवरे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अमित चौगुले संपादित ‘रोटरीनामा’ या मासिकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मावळते अध्यक्ष मंगेश अपशंकर आणि सचिव डॉ. गौरव सामनेरकर यांनी गतवर्षात केलेल्या उपक्रमांच्या सामाजिक कार्याचा अहवाल ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून मांडला. कार्यक्रमास माजी प्रांतपाल दादा देशमुख, रमेश मेहेर, राजेंद्र भामरे, आशा वेणुगोपाल, अनिल सुकेणकर,सीए प्रफुल बरडीया, मुग्धा लेले, दिलीपसिंह बेनिवाल, रवी महादेवकर, संतोष साबळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद चिंधडे आणि डॉ. सोनाली चिंधडे यांनी केले. ओंकार महाले आणि डॉ. श्रिया कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सचिव शिल्पा पारख यांनी उपस्थितांचे आभार मानले.