संदीप वाकचौरे यांच्या सृजनाची वाट पुस्तकास मराठा मंदिरचे पारितोषक

संगमनेर प्रतिनिधी
मुंबई येथील मराठा मंदिर साहित्य शाखेच्या वतीने साहित्य पारितोषक 2022 ची घोषणा करण्यात आली आहे. वैचारिक साहित्य प्रकारांमध्ये संदीप वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला पारितोषिक जाहीर करण्यात आल्याची माहिती मराठा मंदिर साहित्य शाखेचे कार्याध्यक्ष प्रदीप विचारे यांनी दिली आहे. मराठा मंदिर या संस्थेचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे.
सनय प्रकाशनाचे वतीने प्रकाशित करण्यात आलेले सुर्जनाची वाट हे शिक्षण विषयावरचे संदीप वाकचौरे यांचे पुस्तक आहे. मराठा मंदिर साहित्य शाखेच्या वतीने कादंबरी, कथा, काव्य ,प्रवास ,समीक्षा ,संशोधन ,चरित्र, बाल वांड:मय ,ललित वांड:मय ,वैचारिक साहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये साहित्य पारितोषकाची घोषणा करण्यात आली आहे. संदीप वाकचौरे यांच्या सृजनाची वाट या पुस्तकाला वैचारिक साहित्य प्रकारातून द्वितीय क्रमांकाचे पारितोषक जाहीर करण्यात आले आहेत.
संदीप वाकचौरे यांनी सृजनाची वाट ,पाटी पेन्सिल ,शिक्षणाचे पसायदान ,शिक्षणाचे दिवास्वप्न, ऐसपैस शिक्षण ,शिक्षण दशा आणि दिशा ,शिक्षणवेध आधी पुस्तकांचे लेखन केले आहे. चपराक प्रकाशाच्या वतीने विनोबांची शिक्षण छाया ,परिवर्तनाची वाट ही पुस्तके लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. वाकचौरे हे सातत्याने महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये शिक्षण विषयक सदर व प्रासंगिक लेखन करत आहेत. शिक्षण विषयक स्तंभलेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. सुजनाची वाट या पुस्तका संजय मालपाणी यांची प्रस्तावना लाभली आहे.
सदरचे पारितोषक शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.यावेळी पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू ,भारतातील जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांना देखील सन्मानित करण्यात येणार असून त्यांचे मी, मराठी साहित्य व भारतीय अर्थव्यवस्था या विषयावरती व्याख्यान आयोजित करण्यात आले आहेत. पारितोषिक वितरण समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.पारितोषक मिळाल्याबद्दल सनय प्रकाशाचे शिवाजीराव शिंदे, डॉ. सुधीर तांबे, डॉ संजय मालपाणी,चपराचे घनश्याम पाटील, डॉ.सोमनाथ मुटकुळे,माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, शिवाजीराव तांबे, डॉ. शकुंतला काळे, डॉ दिनकर पाटील, परशराम पावसे ,उमेश डोंगरे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, विस्ताराधिकारी त्रिभुवन दीपक आदींनी अभिनंदन केले आहे.