दत्ता ठुबे पारनेर:-सुपा एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीत दोन कामगारांमधील गाडी पार्किंग वादाचे रुपांतर चाकु हल्ल्यात झाले. हल्ल्यातील जखमी कामगाराची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने कामगाराच्या आईने अहमदनगर जिल्हा माथाडी कामगार सेना अध्यक्ष अविनाश पवार यांना सर्व परिस्थिती सांगितली व मदत करण्यासाठी विनंती केली. पवार यांनी १००% मदत करण्याचे आश्वासन देऊन हाॅस्पीटलमध्ये जाऊन प्रत्यक्षात कामगाराच्या तब्येतीची चौकशी करत डाॅक्टर यांची भेट घेऊन चर्चा केली.कंपनी मॅनेजमेंटचे म्हणने ऐकून कंपनीमध्ये भेट देऊन चर्चा केली.माथाडी कामगार सेनेचे राज्य अध्यक्ष श्री सचिन गोळे ,अरविंद गावडे आणि सरचिटणीस महेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुत्र फिरवत कंपनीचे एच आर मॅनेजर यांच्या सोबत चर्चा करत कामगाराचा सर्व हाॅस्पीटलचा खर्च १ लाख १५ हजार कंपनीने करण्याची जिम्मेदारी घ्यावी कामगारांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे त्यामुळे कामगार खर्च करु शकत नाही आपण काही पण करा पण सर्व हाॅस्पीटलचा खर्च करण्याची मागणी केली असता कंपनी व्यवस्थापणाने सकारात्मक चर्चा करत त्यातून मार्ग काढत सर्व खर्च करण्याची जिम्मेदारी घेऊन १लाख १५हजार बिल अदा करत आज कामगाराला डिस्चार्च करण्यात आले त्यामुळे जखमी कामगारासह त्यांच्या आईने अडचणीच्या काळात आधार दिल्यामुळे सन्माननीय श्री राज ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे आभार व्यक्त केले.
योग्य पद्धतीने पाठपुरावा झाल्यामुळे कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोखा ठेवण्यात मनसेला मोठे यश आले असुन भविष्यात कामगारांसह कंपनी व्यवस्थापन यांच्यात योग्य मध्यस्थी करून कामगारांना न्याय मिळून देण्यासाठी सक्षमपणे उभे राहू. जिथे जिथे कामगारावर अन्याय होईल तिथे तिथे मनसे पोहचणार