भैरवनाथ सोसायटीच्या चेअरमन पदी अर्जुन मोटे, व्हा.चेअरमन सचिन मोटे यांची निवड

सोनई–( विजय खंडागळे)-
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री.अर्जुन भाऊराव मोटे तर व्हा.चेअरमन पदी श्री.सचिन विलास मोटे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी श्री.आर. एन.जहागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संभाजी चव्हाण यांनी काम पाहिले.
चेअरमन पदाची सूचना संजय भाऊसाहेब मोटे तर त्यास अनुमोदन बाळासाहेब सूर्यभान जामकर यांनी दिले.व्हा.चेअरमन पदाची सूचना बाळासाहेब सोपान शिंदे यांनी मांडली तर अनुमोदन संजय गोरक्षनाथ बऱ्हाटे यांनी दिले.कार्यकर्ते राहुल मोटे यांनी सूत्रसंचालन तर आभार माजी सरपंच बाबासाहेब सुधाकर मोटे यांनी मानले.
या निवडीवेळी नवनिर्वाचित संचालक शशिकला नजन, संजय बऱ्हाटे,अर्जुन मोटे,ओंकार मोटे,सचिन मोटे,प्रल्हाद मोटे,संजय मोटे,बाळासाहेब शिंदे,दत्तात्रय वैरागर, अर्चना मोटे,नंदा मोटे,नामदेव पतंगे,बाळासाहेब जामकर,लक्ष्मण मोटे,संतोष पतंगे, शिवाजी मोटे,दादा मोटे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते. नूतन पदाधिकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.