इतर

अहमदनगर- पुणे महामार्गावर टँकर पलटी चालक गंभीर जखमी .

अहमदनगर दि 30 .अहमदनगर पुणे महामार्गावर टाँकर पलटी चालक गंभीर जखमी . नारायणगव्हाणच्या युवकानी वाचवले चालकाचे प्राण
अहमदनगर -पुणे महामार्गावरील महत्त्वाचा ब्लाँक स्पाँट असलेल्या नारायणगव्हाण येथे टँकर लाईट पोलला धडकुन पलटी झाला यात टँकर चालकाचे पाय गुंतलेले होते . गावातील युवकानी मोठ्या प्रयत्नानी चालकाचे प्राण वाचवले .


याबाबतीत सुपा पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार सुनिल कुटे यांनी सांगितलं कि मंगळवारी सकाळी अहमदनगर पुणे माहामार्गावर नारायणगव्हाण गावा लगत एक टँकर पलटी झाला असुन त्यात चालक अडकला आहे अशी माहिती मिळाली घटनेची माहिती कळतात सुनिल कुटे, ओहळ रमेश शिंदे व दोन होमगार्ड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी टँकर गाडी क्रमांक MH 14 KA 2722 ही गाडी परळी वैद्यनाथ वरुन पुण्याच्या दिशेने जात आसताना नारायणगव्हामधील अरुंद रस्तामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी एका विजेच्या पोलवर धडकुन पलटी झाली . गाडी पलटी झाल्यावर चालकाचे पाय गुंतले होते . चालकाचे पाय गुंतलेले पाहुन नारायणगव्हाण मधील युवक शुभम काळे अक्षय कांडेंकर मनोज शेळके संभाजी कांडेकर सादीक शेख यांनी आपल्या जीवाची परवा न करता जाँक व इतर साहित्य वापरुन चालकाला बाहेर काढले व त्याला रुग्णालयात दाखल केले . स्थानिक युवकामुळे चालकाचे प्राण वाचले .
अहमदनगर पुणे महामार्गावर नारायणगव्हाण व सुपा गावात अजुनही रस्त्याचे काम झाले नाही व तेथे रस्ता दुभाजक नसल्यामुळे असे अपघात नेहमीच होत असतात .हा रस्ता धोकेदायक बनला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button