चास च्या भैरवनाथ विद्यालयात विनोदी रान कवितांची मेजवानी!

अकोले(प्रतिनिधी)
रान कवी तुकाराम धांडे यांनी एक ना अनेक ह्रदयस्पर्शी,भावनिक, ग्रामीण बाज असलेल्या तरल व विनोदी कवितांचे सादरीकरण करून उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांची मने जिंकली .
मुलांना कवीचा परिचय होण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता व कल्पनाशक्तीला वाव मिळावा या उद्देशाने तसेच वाचन प्रेरणा दिनाचा संदर्भ ठेवून भैरवनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेज चास तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चास व परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा, कवी बाळासाहेब शिंदे, भैरवनाथ आधार प्रतिष्ठाण चास यांच्या समन्वयाने अकोले तालुक्याचे भूषण, रानकवी तुकाराम शिवराम धांडे यांचा कविता गायनाचा व प्रत्यक्ष अनुभवाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
असं म्हणतात की “जे न देखे रवी ते ते देखे कवी” कविचं भावाविश्व किती मोठं असतं याचा अनुभव या माध्यमातून मुलांना झाला.पर्यावरणाशी, सहयाद्रीतील जंगलांशी असलेले अतूट नाते,व डोंगराळ, आदिवासी, दरी खोऱ्यात असलेल्या जन्मभूमीशी असलेली नाळ यांचे महत्व यावेळी मुलांना कवितेतून उमगले. रानकवी तुकाराम धांडे यांच्या कविता मराठी च्या इयत्ता 3 रीच्या पुस्तकात असलेली ‘रानवेडी’ व इयत्ता 9 वी ला असलेली ‘वनवासी’ कविता त्यांनी प्रत्यक्ष गायनाच्या अनुभवातून विद्यार्थी व मान्यवरांच्या समोर आपल्या शैलीत गाऊन दाखविली.

प्रास्ताविक व सूत्रसंचलन विजय दुरगुडे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस. एल. चौधरी , चास गावच्या सरपंच सौ सुरेखाताई शेळके, उपसरपंच सचिन शेळके, ग्रामपंचायत सदस्य गणेश शेळके, राहुल देशमुख , रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल वैद्य , भैरवनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, चास गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एल. चौधरी,
भारत शेळके , शिवराम भोर, कवी बाळासाहेब शिंदे , विजय दुरगुडे , भास्कर तुरनर , भैरवनाथ विद्यालयाचे व कॉलेजचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार राहुल देशमुख यांनी मानले.