सोलापुरात बतकम्मा संबरालू रंगारंग सोहळा’.!

.
सोलापूर : नवरात्रीत ‘अष्टमी’ला शहराच्या पूर्व भागातील तेलुगु भाषिक महिलांमध्ये आनंदोत्सव वातावरण असतो. यादिवशी संध्याकाळी एका पाटावर विविध रंगी फुलांचा थर बनवून त्यासमोर हळदीच्या सहाय्याने गौरी देवी बनवून मनोभावे पूजा करुन त्याभोवती फेर धरत लोकगीते म्हणत नृत्य करतात. त्यालाच ‘बतकम्मा’ संबोधतात.
अंदाजे १२ – १३ वर्षांपूर्वी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनतर्फे १५ फुटाचा ‘बतकम्मा’ स्वतः तयार करुन पहिल्यांदा सामुहिक पध्दतीने उत्कृष्ट फेर धरणा-या महिलांना चाटला पॅटनी सेंटर कडून आकर्षक साड्या देण्यात आला आहे. या वेळेस ‘बतकम्मा’ सजवून आणून त्याभोवती उत्कृष्ट फेर धरणा-या महिला व युवतींना ‘चाटला’कडून अकरा आकर्षक साड्या बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश सरगम आणि पद्मशाली सखी संघमच्या सचिवा ॲड. रेखा गोटीपामूल यांनी दिले आहे.
तेलंगाणा प्रांतात प्रत्येक कुटूंब नवरात्रोत्सवात दररोज बतकम्मा साजरा करतात. ‘ब्रतुकम्मा’चे शब्दभ्रंश होऊन ‘बतकम्मा’ म्हटले जाते. तेलंगाणाच्या ग्रामीण भागात आजही ‘ब्रतुकम्मा’ म्हणून संबोधतात. व्हिवको प्रोसेस समोरील श्री मार्कंडेय बागेत रविवार, २२ ऑक्टोंबर रोजी रात्री ७ ते ९ यावेळेत विविध रंगी फुलांचा बतकम्मा आणून लोकगीतांवर उत्कृष्ट लोकनृत्य करणा-या महिला आणि युवतींना चाटला पॅटनी सेंटर कडून आकर्षक साडी पारितोषिके माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
बतकम्मा संबरालू रंगारंग सोहळ्यात महिला आणि युवतींनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग होउन पारितोषक जिंकावे असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती , मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी आणि सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी, उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सहसचिवा ममता तलकोकूल, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, समन्वयिका अरिता इप्पलपल्ली, अंबुबाई पोतू, कला चन्नापट्टण, हा उपक्रम यशस्वीतेसाठी सदस्या रजनी दुस्सा, भाग्यश्री पुंजाल, सुरेखा गोली, लता मुदगुंडी, आरती बंडी, सारिका वंगा, दिव्या रच्चा, पल्लवी संगा, प्रिती बंडी, जयंती बंडी, सुरेखा भिमनपल्ली, स्वरुपा बंडी, स्वाती इंदापूरे, लता बंडी, विजया बत्तुल, विशाखा सरगम, पद्मा उपलंची, प्रभावती दोरनाल, वंदना बंदगी, दुर्गा रेस, नर्मदा रेस, मुक्ता बल्ला, उमा शंकूर, कलावती येलदी, संगीता म्याकम, प्रतिभा दासरी, ममता बोलाबत्तीन, वज्रेश्वरी गाजूल, साधना बेत, प्रमिला चन्नापट्टण आदी प्रयत्नशील आहेत.