राष्ट्रवादी महिला आघाडीच्या आदिवासी भागात 50 शाखा!

1 जून पर्यंत 100 शाखा करण्याचा मानस
अकोले प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या सौ.सुनिताताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली व पुढाकाराने बचत गटांना मार्गदर्शन, महिलांना प्रशिक्षण व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शाखेचे उदघाटन या त्रिसूत्री धोरणामुळे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या आदिवासी भागात लव्हाळवाडी येथे आज 50 व्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी येथील 50 आदिवासी महिलांना आदिवासी महिलांचे लुगडे म्हणजे 50 फडकी व कुरडई व शेवया करण्यासाठी 50 सोऱ्यांचे वाटप सौ.भांगरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच नागली पासून १६ पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन ही यावेळी महिलांना करण्यात आले.
सौ.सुनीताताई भांगरे यांचा १ जून रोजी वाढदिवस असल्याने त्या वाढदिवसाचे निमित्त साधून पक्ष संघटन वाढविण्यासाठी व राष्ट्रीय नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,संसद रत्न खा.सुप्रियाताई सुळे यांचे हात बळकट करण्यासाठी व महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करण्याच्या दृष्टीने 100 शाखांचे उदघाटन पूर्ण करण्यात येईल असा मानस सौ.सुनीताताई भांगरे यांनी केला.

एक महिला पक्ष वाढीसाठी, महिला बचत गट वाढीसाठी,महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी काय करू शकते हे सौ.सुनीता ताई भांगरे यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवीत आहे.त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी अकोले विधानसभा अध्यक्षा सौ. राजश्री आवारी, सौ.जयश्री देशमुख, सौ सुरेखा सातपुते, विकास बंगाळ,अभिजित वाकचौरे, अर्जुन खोडके, कुशाबा पोकळे, रावजी मधे आदींसह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
