अहमदनगर

तृतीय रत्न नाट्य प्रयोगास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था नागपूर आयोजित आणि महात्मा फुले समता परिषद अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आले होते.

या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला होता. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे. या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाचे प्रयोग करण्यात आले आहे.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून त्यांच्यासह ३० कलाकार आणि सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग आहे. याआधी विविध जिल्ह्यात दहा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे.

महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच समाजात उल्लेखनीय कार्याबद्दल योगेश गवळी ,मच्छिंद्र गुलदगड, बेबीताई गायकवाड, जालिंदर बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार दादाभाऊ कळमकर ,समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,महानगराध्यक्ष दत्ता जाधव ,जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे , तालुका अध्यक्ष रामदास फुले पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष भरत गारुडकर ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते ,माजी महापौर भगवानराव फुलसौंदर, सचिन गुलदगड संतोष हजारे लवेशजी गोंधळे शाहू होले, हरिभाऊ पुंड, भानुदास फुले, संजय गारुडकर प्रशांत शिंदे अशोक गोरे राहुल भुजबळ, सागर शिंदे,तेजस नेमाने यांसह मान्यवरांची उपस्थिती होती . तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button