अकोल्यातील पिंपळदरावाडी च्या उपसरपंचपदी रोहिणी भांगरे यांची निवड.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील पिंपळदरावाडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी गुलाब भागरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवडणूकीत नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच म्हणून सचिन भांगरे हे निवडून आले होते.तर रामा भांगरे,जगन भांगरे, रोहिणी भांगरे, म्हाळसाबाई भांगरे,मिराबाई भांगरे, साहेबराव भांगरे हे सदस्य म्हणून निवडून आले होते.सरपंच पदासह एकूण सात उमेदवार निवडून आले होते.या निवडणूक प्रक्रियेमध्ये उपसरपंचपदाची निवडणूक येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकनियुक्त सरपंच सचिन भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
यामध्ये रोहिणी गुलाब भांगरे यांची उपसरपंचपदी एकमताने निवड करण्यात आली.यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून वनपाल जे.आर. पटेल,कामगार तलाठी राजु खेमनर,ग्रामसेवक दत्तात्रय घुमरे यांसह नवनिर्वाचीत सरपंच, सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी भांगरे यांनी गावात विविध योजनांमार्फत विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशिल राहू असे विचार यावेळी व्यक्त केले.