कष्टकरी वर्गाला न्याय देण्यात कम्युनिनिष्ठांचे मोठे योगदान —- शिवाजीराव देवढे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
जाती धर्माच्या नावाखाली फुट पाडणार्या विचारांना शह देण्यासाठी व सर्व श्रमिक शेतकरी कष्टकरी वर्गाला त्यांच्या न्याय्य हक्क मिळवून देण्यात देशातील कम्युनिस्ट चळवळीचे मोठे योगदान असून तरूणांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विविध जनसंघटनामधे सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन निवृत्त प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अधिवेशन येथील लोकनेते मारुततराव घुले पाटील मंगल कार्यालयात जेष्ठ नेते कॉ शशिकांत कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले.
देशभरातील धार्मिक व जातीयतेला मूठ माती देणारा एकमेव कम्युनिस्ट विचार आहे त्याचबरोबर कामगार शेतकरी कष्टकरी या सर्व वर्गाचे प्रश्न अतिशय पोट तिडके ने मांडणारा कम्युनिस्ट विचार भांडवलदारी व्यवस्थेला विरोध करून सर्वसामान्य जनतेचे हित जोपासणारा विचार सोबत घेऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष जनतेच्या प्रश्नांंना वाचा फोडण्याच काम करत आहे. पुरोगामी विचारांना पुढे नेऊन प्रतिगामी विचारांना विरोध करण्याचे काम भारतीय कम्युनिस्ट पक्ष करत असल्याचे प्रतिपादन प्राचार्य शिवाजीराव देवढे उद्घाटन प्रसंगी बोलताना केले सुरवातीला जेष्ठ कॉम्रेड कृष्णनाथ पवार यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकावण्यात आला. तालुका सेक्रेटरी कॉ भगवान गायकवाड यांनी प्रास्ताविक करून गत तीन वर्षांचा अहवाल सादर केला.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ ॲड सुभाष लांडे राज्य कौन्सिल सदस्य संजय नांगरे, बापूराव राशिनकर, बबनराव पवार, कारभारी वीर, दत्तात्रय आरे, राम लांडे, भगवानराव डावरे, अशोक नजन, आत्माराम देवढे, मुरलीधर काळे, संजय डमाळ, अंजाबापू गायकवाड, विष्णू गोरे, राजेंद्र घनवट, योव्हान मगर, अय्युबभाई पठाण आदि उपस्थित होते या वेळी तालुका कौन्सिल ची निवड करण्यात आली तालुका सचिव पदी कॉ. संदीप ईथापे, तर सहसचिव पदि वैभव शिंदे व बाळासाहेब म्हस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे एकनाथ वखरे,माऊली फटांगरे,आशोक वाघमारे,अजिनाथ ससाणे, बाळासाहेब केशर आदिंनी हे अधिवेशन पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.