ग्रामीण

मातोश्री सायन्स कॉलेज च्या विद्यार्थी प्रतिनिधी (GS) पदी प्रथमेश बरकडे याची निवड

.पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील- मातोश्री शैक्षणिक संकुल, कर्जुले हर्या अंतर्गत मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया मोठ्या डाम डौलामध्ये पार पडली.  मातोश्री सायन्स कॉलेजमध्ये दरवर्षी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. यावर्षी प्रथमेश बरकडे (पळशी), ज्ञानेश्वर शिंदे (पोखरी), खैरे ओंकार (पोखरी) या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता.परंतु सदर निवडणुकीमध्ये प्रथमेश बरकडे याला पहिल्या पसंतीचे सर्वाधिक मते मिळाली व सदर निवडणुकीमध्ये प्रथमेश बरकडे याने बाजी मारली व त्यांची विद्यार्थी प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली. निवडणूकीमध्ये संस्थेचे सचिव किरणशेठ आहेर यांनी विजयी उमेदवार घोषित केल्यानंतर महाविद्यालयात मिरवणूक व  मोठ्या प्रमाणात फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली.
 मातोश्री सायन्स कॉलेज मध्ये विद्यार्थी प्रतिनिधी बरोबरच क्लास प्रमुख(CR), विद्यार्थिनी प्रमुख(LR), सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, शिस्त विभाग, परीक्षा विभाग, संगणक विभाग, प्रयोग विभाग, सहल विभाग, अशा विविध विभाग प्रमुखांची निवड करण्यात आली. मातोश्री सायन्स कॉलेज सातत्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे भावी आधारस्तंभ आहे त्यांना समाजसेवेची तसेच नेतृत्वगुणाची आवड निर्माण व्हावी यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
 सदर निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले विद्यार्थी प्रतिनिधी व सर्व निवड झालेल्या सर्व विभाग प्रमुखांचे संस्थेचे अध्यक्षा सौ. मीराताई आहेर, सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.दिपक आहेर, संचालिका डॉ. श्वेतांबरी आहेर, संचालिका शितल आहेर, रजिस्टार यशवंत फापळे,  प्राचार्य राहुल सासवडे, शिक्षक गणेश हांडे, सोनल पायमोडे, राजेंद्र साठे, आर एल चौधरी, सुवर्णा उंडे, राणी रासकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button