अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांआरोपींच्या राजूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

,राजूर प्रतिनिधी :-
राजूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई दारू माफियांच्या आवळल्या मुसक्या.
अवैध दारुची वाहतुक करणारे तीन आरोपी वाहनांसह राजुर पोलीसांच्या ताब्यात.घेतले आहे
दि.27/12/2021 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संताजी चौक राजुर येथे दोन इसम मोटार सायकलवर दारूचे बॉक्स घेवुन येणार असल्याची माहीती राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना मिळाली.सदर वाहनावर कारवाई करण्याकरिता एका टीमला संताजी चौक राजुर येथे रवाना केले असता तेथे दोन इसम काळया रंगाच्या मोटार सायकलवर निलेश अशोक घाटकर,रा-राजुर याला दारुचे बॉक्स देत असताना छापा टाकुन गाडीसह सदर दोन इसम व निलेश घाटकर यांना ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातील दारुचा मुद्देमाल 11520/-रु.कि.च्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 192 सिलंबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली. 40,000/- रु. कि. हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्पेलडर प्लसं विना नंबरची जु.वा. कि.अ.एकुण-51,520 /- रु.कि.
आरोपी निलेश अशोक घाटकर,ओम रामदास उघडे,वय-22 रा-म्हाळदेवी,ता-अकोले,
सचिन सुदाम जाधव,वय-25 रा-संगमनेर यांच्या विरुद्ध राजुर पोस्टे गु.र.नं 217/2021 मु.पो.ऑक्ट कलम 65(अ),83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस हवालदार कैलास नेहे, पोलीस नाईक देवीदास भडकवाड, अशोक गाडे, विजय फटांगरे, राकेश मुळाने आदी करीत आहे.