महाविद्यालये संपन्न होतात ती विदयार्थ्याच्या यशामुळे – डॉ.मनोहर चासकर

महाविद्यालये संपन्न होतात ती विदयार्थ्याच्या यशामुळे – डॉ.मनोहर चासकर
पुणे दि 25
डॉ.डी.वाय.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी महाविदयालयात नुकतेच पदव्युत्तर विभागाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन सावित्रीाबाई फुले पुणे विदयापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिश्ठाता मा.डॉ.मनोहर चासकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. पदव्युत्तर विभागातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना .डॉ.मनोहर चासकर यांनी प्रथम महाविदयलयातील विदयार्थ्यांची शिस्तीचे कौतुक केले विदयार्थ्यांनी आपला कल विचारात घेवुनच आपल्या शाखेची निवड केली आहे व प्रत्येकाने आपल्या शाखेतील संधीचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. कोरोना काळात देखील आपण स्पर्धेत टिकेल असा सर्वांगिण विकास केला पाहिजे. आपण अभ्यास करत असताना सर्वांगिण विकासासाठी आपल्यामधील सुप्त गुण तसेच कलांकडे दुर्लक्ष करू नका असे देखील त्यांनी विदयार्थ्यांना आर्वजुन सांगितले आपली मातृभाशा तसेच इंग्रजी यावरील प्रभुत्त्वामुळे आयुष्य जगत असताना ब-याच गोष्टी सुखकर होतात असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम प्रसंगी मागील वर्षी पदव्युत्तर विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विदयार्थ्यांना गौरविण्यात आले. महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विदयार्थ्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी ज्ञानाचा कसा उपयोग करावा हे सांगितले
कार्यक्रमाचे आयोजन डॉ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीच्या अध्यक्ष मा.डॉ.पी.डी.पाटील, सेक्रेटरी मा.डॉ.सोमनाथदादा पाटील, विश्वस्त मा.डॉ.स्मिता जाधव तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन यांच्या मार्गदर्षनाखाली करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ.मुकेष तिवारी, प्रा.गणेष फुंदे प्रा.मिनल भोसले, प्रा.करिष्मा सय्यद, प्रा.मंजुशा कोठावदे, प्रा.हेमल ढगे, तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सर्व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. सुत्रसंचालन प्रा.भागवत देसले यांनी केले तर आभार डॉ.विजय गाडे यांनी मांडले.