खरवंडी कासार ग्रामपंचायत उपसरपंच पदी रावसाहेब पवळे बिनविरोध!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रावसाहेब पवळे यांची निवड करण्यात आली
खरवंडी कासार चे उपसरपंच दिलीप पवळे यांचे कोरोनासंसर्गाने निधन झाले होते त्यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली पोटनिवडणुकीमध्ये त्यांचे बंधू रावसाहेब पवळे बिनविरोध निवडून आले होते या निवडीनंतर त्यांची मंगळवारी दि 4रोजी उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर त्यांचा ग्रामपंचयत मध्ये सत्कार करण्यात आला

यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मिथुन डोंगरे, सरपंच प्रदीप पाटील ग्रामविकास अधिकारी ,हनुमान खेडकर, मा.सरपंच राजू जगताप, सोना कसबे,ग्रा.सदस्य योगेश अंदुरे, बाळासाहेब जगताप, दौलतराव सोनवणे, युसुफभाई बागवान, सुजित जगताप,भगवान जगताप, रवि पवार,गोविंद पवळे, गुलाब सय्यद, आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
—— ——-