राजूर येथे श्रीरामनवमी उत्सव समिती चे वतीने रक्तदान शिबीर संपन्न.

राजूर प्रतिनिधि
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान* हे समजून हाच संकल्प समोर ठेवत गेले ३ वर्षांपासून राजूर येथील काही तरुण युवक एकत्र येऊन ग्रामस्थांच्या वतीने ऐक्याची भावना जपत दरवर्षी रक्तदान शिबीर घेत असतात. सालाबादप्रमाणे याहीवर्षी प्रभू श्रीरामनवमी उत्सव समिती राजूर यांच्या संकल्पनेतून मर्यादम पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मउत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी राजूर येथील तरुणांनी मोठे परिश्रम घेतले.जास्तीत जास्त रक्तदान केले जावे यासाठी तरुणांना रक्तदानाचे आव्हान करण्यात आले होते.राजूर ग्रामस्थांमधून मोठ्या संख्येने रक्तदान करण्यात आले.राजूर मध्ये असे अनेक लोकपयोगी शिबिरे तरुण युवकांच्या माध्यमातून घेण्यात येत असतात.या रक्तदान शिबिरात राजूरमधील तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात रक्तदान केले तसेच राजूरमधील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते यांनीही रक्तदान केले राजूर पोलिस ठाण्याचे श्री अशोक गाडे मेजर यांनीही आवर्जुन उपस्थित राहून रक्तदान केले राजूर मधील काही पत्रकारांनीही रक्तदान केले या वेळी 150 रक्तदात्त्यानी रक्तदान केले गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महामारीच्या रोगाने मोठे थैमान देशात व राज्यात घातले आहे,त्या काळात रक्ताचा मोठा तुटवडा पडला होता.मात्र वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेत असल्याने अनेकांना याची मदत झाली होती.सीमेवर लढणारे भारतीय सैनिक यांना आपले रक्त माय भूमीसाठी लढत असताना सांडावे लागते.त्यावेळी तेव्हा रक्ताचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून आपणही आपल्या भागातून खारीचा वाटा उचलला पाहिजे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून राजूर परिसरातील तरुण रक्तदान शिबीर वेळोवेळी घेत असतात गोरगरीब जनतेपर्यंत ही मदत पोहोचावी यासाठी रक्तदान करून देशाप्रती आपले सेवा सुरू ठेवावी हा उद्देश यावेळी तरुण युवकांनी बोलतांना सांगितले
.———-//—-