प्रहार संघटनेच्या ठिय्या आंदोलनाला यश

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या वतीने दिनांक 13 / 12 /2021 रोजी दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करणे बाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांना निवेदन देण्यात आले होते.
सदर निवेदनामध्ये दिव्यांगांना दरवर्षी देण्यात येणारा पाच टक्के निधी वाटप करावा सदर निधी वाटप करत असताना प्रशासनाकडून कायम हलगर्जीपणा होऊन थेट वर्षअखेरीस वाटप करत असतात. त्याऐवजी आत्तापासूनच सदर निधी हा दिव्यांगांना देण्यात यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीताई देशमुख, तालुकाध्यक्ष संदीप बामदळे शहराध्यक्ष अशोक कुसळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन 30 डिसेंबर रोजी ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता.
त्या निवेदनाची दखल घेऊन शेवगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तात्काळ सर्व ग्रामपंचायतींना दिव्यांगाचे निधीबाबत पत्र पाठवून सदर निधी तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहे. व आत्तापर्यंत या वर्षीचा एकूण सहा लाख 45 हजार 299 या वर्षी साठी तरतूद आहे त्यातील दोन लाख 23 हजार एकशे आठ रुपये निधी दिव्यांग बांधवांना देण्यात आला. असून उर्वरित शिल्लक चार लाख बावीस हजार एकशे एकोनीश रुपये हे 31 मार्च 2022 अखेर शंभर टक्के खर्च करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी गट विकास अधिकारी यांचे अभिनंदन करून आजचे ठिय्या आंदोलन थांबवण्यात आले.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, शहराध्यक्ष अशोक कुसळकर, मिडिया प्रमुख विकास गटकळ, ऋषी बर्डे, जावेद शेख, महेश घनवट, कल्पेश दळे, प्रवीण निकम, रामदास लिंबोरे, संजय नाचण, करण बोंद्रे, आझाद विघ्ने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.