आजचे पंचांग व राशिभविष्य दि १३/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४४
दिनांक :- १३/०४/२०२२,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४४,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति २८:५०,
नक्षत्र :- मघा समाप्ति ०९:३७,
योग :- गंड समाप्ति ११:१४,
करण :- बव समाप्ति १७:०२,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,(१५:४५नं. मीन),
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- गुरु – मीन १५:४५,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३० ते ०२:०३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१५ ते ०७:४९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:३० पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:११ ते ०६:४४ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
तिथिवासर ११:०० प., विष्णूला दवणा वाहणे, घबाड ०९:३७ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र २३ शके १९४४
दिनांक = १३/०४/२०२२
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल.
वृषभ
कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.
मिथुन
भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.
कर्क
फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.
सिंह
काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणीवर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.
कन्या
धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नका.
तूळ
जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.
वृश्चिक
भावंडांना मदत कराल. जोडीदाराचे विचार समजून घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचा वाचक राहील. प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. आरोग्यात सुधारणा होईल.
धनू
बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. फार चिंता करण्यात वेळ वाया घालवू नका. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. धार्मिक ग्रंथांचे वचन कराल.
मकर
मानसिक स्थैर्य जपावे. सारासार विचार करून निर्णय घ्यावा. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बारा नव्हे. मैत्रीचे संबंध दृढ होतील. अचानक धनलाभ संभवतो.
कुंभ
सामुदायिक गोष्टींचे भान राखा. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. भावंडांची मदत घेता येईल. योग्य परिक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्याव्यात.
मीन
व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. व्यावसायिक वृद्धीचे नियोजन करावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर