जादूगार पी.बी. हांडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक्सलन्स अवार्ड 2023 प्रदान

अकोले प्रतिनिधी
ज्येष्ठ जादूगार, सामाजिक कार्यकर्ते व लोकसारथी चे संपादक जादूगार हांडे यांना महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक्सलन्स अवॉर्ड 2023 मा. मंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .जादूगार हांडे हे गेली 35 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन पर सप्रयोग व्याख्याने देतात महाराष्ट्रात 845 व्याख्याने दिली आहेत .जादूची दुनिया या जादू कार्यक्रमाद्वारे बारशाच्या वर सामाजिक संस्थांना कार्यक्रमाद्वारे आर्थिक मदत मिळवून दिली आहे. स्वतःच्या जादुगार पी.बी.हांडे सोशल फाउंडेशन सामाजिक संस्थेद्वारे गरजू विद्यार्थी, नागरिक यांना मदत करतात. विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून प्रोत्साहित करतात . महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवितात . अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांडे यापासून समाजमुक्त व्हावा सोशन थांबावे म्हणून सतत प्रबोधन करतात. ते संपादन करीत असलेल्या लोकसारखी मासिकातून समाज प्रबोधन करतात.
त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या खोपोली ते पनवेल 36 किलोमीटर डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालविण्याच्या धाडसी प्रवासाची जागतिक विक्रमात नोंद झाली आहे साहित्यिक कवयित्री पत्नी मंदाकिनी हांडे यांचे त्यांच्या कार्यात मोलाची साथ असते. कला व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल जादूगार पी.बी. हांडे यांना भारत सरकार समाज कल्याण विभागाच्या पुरस्काराबरोबर राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच जागतिक असे एकूण 132 पुरस्कार प्राप्त झाले आहेत सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल झाल्याबद्दल हांडे यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.