शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना तालुकाध्यक्ष पदी पोपटराव पाखरे !

मीनाताई कळकुंबे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी फेरनिवड
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्ष पदी वडुले बु ता.शेवगाव येथील पोपटराव पाखरे यांची नव्याने नियुक्ती तसेच आव्हाणे खुर्द येथील मीनाताई कळकुंबे यांची अहमदनगर जिल्हाच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे.दि.१०/०३/२०२२ रोजी सोलापुर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने एकदिवशीय धरणे आंदोलन केले होते. या ठिकाणी धान्य दुकानदार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.सी.कटारिया, राष्ट्रीय सचिव विजय गुप्ता व राष्ट्रीय उपाध्यक्ष मांगीलालजी जाधोर तसेच सोलापुर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पेंटर, संपर्क प्रमुख नितीन पेंटर, तसेच राज्याचे सचिव महमाने साहेब, विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे, मोहन जी. बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले. नवीन नियुक्ती दिल्या बद्दल मीनाताई कळकुंबे, पोपटराव पाखरे यांचे कैलास बुधवंत, माउली निमसे, पुंजा बर्डे, बाबाभाई शेख, लाला शेख, मतीन शेख, राजू शिनगारे, भारत हरवणे, करंजे सर, अंबादास खंडागळे, राहुल भारस्कर, विठ्ठल झारगड, बद्री केसभट, देविदास बटुळे, देविदास पाखरे, सुधाकर निकम, अशोक औटी, कल्याण भागवत, कृष्णा काळे, कृष्णा वाघमोडे, संजय मरकड, तेलोरे पाटील, आबा साळवे, विष्णू म्हस्के, संजय म्हस्के, कैलास मडके, शिवाजी काकडे, डॉ अमोल फडके यांनी अभिनंदन केले आहे.