आंतर महाविद्यालयात खो-खो क्रीडा स्पर्धा सोनई महाविद्यालयात संपन

सोनई:प्रतिनिधी
दि.3 व 4 जानेवारी 2022 रोजी मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोनई येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अहमदगरच जिल्हा क्रीडा विभाग यांच्या संयुक्त वि्यमाने आंतर महाविद्यालयीन खो-खो क्रीडा स्पर्धा संपन झाल्या. या स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हायातील एकूण 14 संघ सहभगी झाले होते

. या स्पर्धेचे उद्घटन श्रीफळ वाढऊन करण्यात आले या प्रसंगी बोलताना डॉ.ज्ञानदेव झिने म्हणाले खेळाडूंनी नेहमीच विजेता होण्याची जिद्द ठेवावी,जीवनात हर जीत होताच राहते परंतु विजेता होण्याची जिद्द ठेवली तर नक्कीच एक दिवस विजय होतोच असतो. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या कायर्क्रमासाठी डॉ.राहुल भोसले , प्रा. संजय धोपावकर ,डॉ. शरद मगर, प्रा.विनायक काळे, डॉ. अशोक तुवर हे उपस्थित होते. ह्या सपर्धा अतिशय उत्कृट नियोजन डॉ. रविंद्र खंदारे शारिरीक शिक्षण संचालक यांनी केले. या स्पर्धेमध्ये पेमराज सारडा कॉलेज अहमदनगर विजयी तर उप विजयी न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर झाले आहे. सोनई महाविद्यालयाच्या दोन खेळाडूची त्यामध्ये प्रेमाकुमार दराडे, व संदीप जाधव यांची निवड पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झाली. या निवडीबद्दल संस्थेचे उपाअध्यक्ष उदनदादा गडाख सचिव उत्तमराव लोंढे सहसचिव डॉ विनायक देशमुख तसेच प्राचार्य डॉ शंकर लावरे उपप्राचार्य डॉ ज्ञानदेव झिने क्रिडा संचालक डॉ.रविंद्र खंदारे यांनी व सर्व प्राध्यापक वृंद विद्यार्थानी त्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी शूभेच्छा दिल्या.
