इतर

भोजापुर धरण ओव्हर फ्लो ; पाझर तलाव व साठवण बंधारे भरून देण्याची इंजि. हरिश्चंद्र चकोर यांची मागणी       

   
 चंद्रकांत शिंदे पाटील                                                
संगमनेेेर दि १७




 अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरच्या काही भागाला व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारे भोजापुर धरण काल पहाटे शंभर टक्के भरले असून या धरणातून पाझर तलाव व साठवण बंधारे भरून देण्याची मागणी इंजिनीयर हरिचंद्र चकोर यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. 

        संगमनेर तालुक्यातील निमोण -तळेगाव पंचक्रोशीसाठी काही अंशी संजीवनी असलेले म्हाळुंगी नदीवरील भोजापुर धरण काल पहाटे शंभर (१००%)टक्के भरले असून सुमारे ५४० क्युसेक्सने सांडव्यावरुन  म्हाळुंगी नदीपात्रात ओव्हर फ्लो सुरू झाला आहे.भोजापुर धरणाची एकूण साठवण क्षमता ४८३असून मृत साठा सुमारे १०५ दशलक्ष घनफूट इतका व उपयुक्त पाणीसाठा ३६१ दशलक्ष घनफूट इतका आहे. भोजापुर धरणातून निघणाऱ्या १९ किमी लांबीच्या डाव्या  कालव्याद्वारे दोडी शाखा व नांदूर शिंगोटे शाखा कालव्याद्वारे अनुक्रमे सिन्नर तालुक्यातील दहा गावांना व संगमनेर तालुक्यातील निमोणसह पाच गांवाना शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा होतो. तसेच सिन्नर व संगमनेर तालुक्यांतील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनां मार्फत पिण्याचे पाणी देखील पुरवले जाते.
या धरणातून नासिक जलसंपदा विभागाकडून मान्यताप्राप्त असलेल्या खरीप व रब्बी हंगामा करिता उपसा सिंचन योजना द्वारे देखील सुमारे १०० दशलक्ष घनफूट इतका पाण्याचा वापर केला जातो. परिणामतः मूळ प्रकल्पाच्या  पाणी साठा व सिंचन क्षेत्रात निश्चितपणे घट होताना दिसत असून कालव्याद्वारे शेतीच्या सिंचनासाठी सातत्याने अडचणी निर्माण होत आहेत. याकरिता भोजापूर धरण स्थळी मंजूर वाॅटर प्लॅनिंग नुसार सुमारे २०० दशलक्ष घनफूट इतका येवा(यील्ड) उपलब्ध असताना धरणाच्या सांडव्याची उंची किमान एक(१.००मी.) मीटरने वाढवण्याची मागणी सातत्याने लाभक्षेत्रांमधून केली जात असताना शासनाकडून या महत्त्वाच्या मागणीकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे. महत्त्वाचे म्हणजे भोजापूर डाव्या कालव्यावरील व तसेच वितरिकां वरील बांधकामे बहुतांशी नादुरुस्त असून ही बांधकामे तातडीने दुरुस्त करावी किंवा नव्याने बांधून देण्याची मागणी गेल्या ७ वर्षापासून लाभधारक शेतकऱ्यांकडून लेखी निवेदनाद्वारे सातत्याने केली जात असल्याचे इंजिनियर हरिचंद्र चकोर यांनी म्हटले आहे. मात्र नाशिक पाटबंधारे विभागाकडून कोणतीही सकारात्मक व ठोस कार्यवाही केली जात नसल्याने मंजुर  सुधारित  प्रशासकीय प्रकल्प प्रस्तावानुसार कालव्याची वाहनक्षमता २१५ क्युसेक्स पाणी विसर्ग लाभक्षेत्रात पोहोचत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व नाशिक पाटबंधारे विभागाविषयी  लाभक्षेत्रातील शेतकरी व जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीचा सुर दिसून येत आहे. सुदैवाने यावर्षी भोजापुर धरण जुलैमध्येच ओव्हर फ्लो झाल्याने पुढील दोन ते अडीच महिन्याच्या पावसाळी कालावधीमध्ये सिन्नर व संगमनेर तालुक्यातील  ल.पा.तलाव, पाझर तलाव, गावतळे ,दगडी व काँक्रीट साठवण बंधारे ओव्हर फ्लोच्या पाण्याने भरून देणे बाबत भाजपा अभियांत्रिकी सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता  यांचेकडे केली आहे.
त्यामुळे संबंधित नाशिक पाटबंधारे  विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन तळेगाव पर्यंत पूर पाणी पोहोचवण्याचे काम सुरू करावे कारण भोजापुर पुरचारी(१६कि.मी.लांबी व ४५क्युसेक्स विसर्ग वाहन क्षमता असलेली) चे काम पूर्ण होऊन पाच  ते सात वर्ष झालेले  आहेत. तथापि अद्यापही भोजापूरचे ओव्हर फ्लोचे पाणी तळेगाव दिघेपर्यंत पोहोचलेले नसल्याने या भागातील जनतेत मोठी नाराजी आहे. यावर्षी लवकरात लवकर भोजापुर धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे तळेगाव परिसरातील जनतेच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. त्यानुसार नाशिक पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button