इतर

रज्जाक शेख राज्यस्तरीय ‘काव्यज्योत ‘पुरस्काराने सन्मानित

शहारामआगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मराठी साहित्यिक विश्वाचे षट्कोळी साहित्य समूह आणि साहित्यप्रेमी साहित्यिक मंचाचे राज्यस्तरीय तिसरे संमेलन श्रीक्षेत्र देवगड ता.नेवासा याठिकाणी एक व दोन जानेवारी रोजी आयोजित करण्यात होते

.या संमेलनात श्रीरामपूर तालुक्यातील रहिवासी साहित्यिक, गजलकार,लेखक,कवी, रज्जाकभाई शेख यांना राज्यस्तरीय ‘काव्यज्योत ‘ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष कवी विठ्ठल धाडी,डॉ.कुलदीप पवार,प्रमोद पाटील,प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे,संध्याराणी कोल्हे,प्रकाशक नितीन गायके ,डॉ.संतोष तागड,ग्रामीण कवी आनंदा साळवे,कवी गुलाब फुलमाळी हे उपस्थित होते. शेख यांनी जीवन गौरव शैक्षणिक मासिकाच्या माध्यमातून वाचनलेखन चळवळीत सक्रिय राहून काम केले आहे. त्यांच्या एक हजारा पेक्षा जास्त कविता विविध वृत्तपत्र, मासिके व दिवाळी विशेषांक यांत प्रकाशित झालेल्या आहेत.विनोदी कथा लेखनातूनही त्यांनी वाचकांना प्रेरणा दिली आहे. राज्यभरातून शेकडो काव्यसंमेलनात त्यांच्या कवितेची दखल घेतली गेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत.आतापर्यंत लातूर येथे ज्ञानतीर्थ पुरस्कार, नागपूरहून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवंत शिक्षक पुरस्कार, पुण्यातून संत एकनाथ स्मृतिगौरव पुरस्कार, अहमदनगर हून ध्येय आदर्श शिक्षक पुरस्कार, शिर्डीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, ठाण्याहून प्रेरणा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार यासारखे विविध सामाजिक संस्थाकडून वीस शिक्षक पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहे.
शिक्षणाचा वारसा चालवताना मनातील भावनांना शब्दबद्ध करून कविता ,कथा लेख, यांचे लेखन तसेच हास्यकविता,लेख,हायकू,अभंग,प्रेमकविता,गझल,काव्यांजली,,अष्टक्षरी, गजल आदी काव्यप्रकारात लेखन केले आहे.आतापर्यंत अनेक वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून कविता,कथा ,लेख व गझल यांना प्रसिद्धी मिळाली आहे.प्रवरा कम्युनिटी रेडिओ नभोवाणीवर व्याख्यान, कविता व मुलाखतीचे प्रसारण झालेले आहे.त्यांच्या कवितांना युट्युब, एसीबीएन न्युज,सी9 न्युज,अहमदनगर महानगर न्युज, पारनेर टाइम्स ,भारतीय जनमत पुणे आदी टेलिव्हिजन चॅनेलवर कविता व कार्यक्रम सादरीकरण केले आहे. वर्डसामना,शब्दरसिक,क्रांतिसूर्य,लक्ष्मीपुत्र, गोंदण,ग्रामसेवा,आसमंत काव्यप्रेमीचे,भगवानबाबा आदी दिवाळी अंकात तसेच त्यांच्या दर्जेदार कविता प्रतिलिपी,स्टोरीमिरर,लागीर झालं या ऍपवर सापडतात.ते जीवन गौरव शैक्षणिक मासिक सहसंपादक ,शब्दविद्या दिवाळी अंक उपसंपादक,काव्यदरबार बालकाव्य विशेषांक संपादक या पदावर ते साहीत्य चळवळीचे काम पाहतात .त्यांनी आतापर्यंत शंभरच्या वर कविसमेलनाच्या मंचावर कवितांचे सादरीकरण केले आहे. आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गुजरात,अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबाद,आखिल भारतीय मुस्लिम साहित्य संमेलन पुणे,अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे त्यांच्या कवितांची निवड झाली आहे.काव्यक्षेत्रातील यशाबद्दल त्यांचा आतापर्यंत पंच्याहत्तर वेळा व्यासपीठावर गौरव करण्यात आला आहे.लहान मुलांना कवितांची मेजवानी देण्यासाठी “काव्यदरबार” या बाल दिवाळी अंकाचे संपादन केले आहे.आपल्या उत्तम लेखणीद्वारे राज्यातील विविध वर्तमानपत्रातून कोरोना जागृती करण्यासाठी आपल्या तीस ते पस्तीस कवितांना प्रकाशित करून आरोग्य व कोरोना यांच्या भयंकरतेची कल्पना मांडली. राज्यातील विविध वृत्तपत्रातून “खेळू करू शिकू” या शासकीय पुस्तकाचे समीक्षण करून लेखाद्वारे सर्व राज्यभर प्रसिद्धी दिली.शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना मनोरंजक अशा राज्यभरातून गाजलेल्या नामवंत शंभर कवींच्या बालकविता एकत्र करून सर्व विद्यार्थ्यांना मोफत ‘काव्यदरबार’ हा दिवाळी बालकाव्य विशेषांक उपलब्ध करून दिलाआहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कविता सादरीकरणाची हॅट्रिक झाली आहे.मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button