इतर

बनावट चेक देवुन व्यापाऱ्यांची फसवणूक करणारी टोळी  गजाआड! 

अकोले पोलिसांची कामगिरी 

************************************************

अकोले प्रतिनिधी

खरेदीच्या नावाखाली व्यापाऱ्यांना बनावट चेक देऊन फसवणूक करणारी टोळी अकोले पोलिसांनी आज गजाआड केली

 अकोले शहरातील व्यापारी अक्षय संजय देशमुख रा उंचखडक ता अकोले व नानासाहेब बबन मालुंजकर यांचेकडुन 

रुपये 3,07,895 रुपयांचे बिल्डींग साठी लागणारे इलेक्ट्रीक सामान व स्टिल खरेदी करुन त्यांना बँक ऑफ बडोदा व भारतीय स्टेट बँकेचे बनावट चेक देवुन 3,07,895 रुपये किमंतीचे साहित्य घेवुन

अशोक मगन मोहिते रा नाशिक हा नाशिक येथे पसार झाला. सदर इसमाने दिलेले चेक हे बँकेत वटविण्यासाठी यातील फिर्यादी व साक्षीदार बँकेत गेले असता सदरचे चेक हे बनावट असल्याचे बँकेने कळविले नंतर त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर इसम अशोक मगन मोहिते याचेशी संपर्क केला असता तो उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला.सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन अकोले पोलीस स्टेशनला तात्काळ गुरनं 515/2022 भा.द.वि कलम 420, 467,468 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ट अधिकारी यांचे मार्गदर्शानाखाली तपासाचे चक्र फिरवत मुख्य आरोपी 1)अशोक मगन मोहिते याचा शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. पंरतु त्याचे साथीदार 2)राहुल विष्णु शिरसाठ 3) विक्रम विलास वरखेडे दोन्ही रा चाटोरी ता निफाड जि नाशिक हे पुन्हा अशोक मगन  मोहिते याचे सांगण्यावरुन व्यापारी वर्गाची फसवणुक करण्यासाठी अकोले येथे आले असता त्यांना तात्काळ अटक करुन त्यांना मा. न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन सदर आरोपींचे मदतीने गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी अशोक मगन मोहीते रा बेलदारवाडी, म्हसरुळ जि नाशिक येथे जावुन  त्यास ताब्यात घेतले 

  त्यास अटक करुन त्याने  गुन्ह्यात फसवणुक केलेल्या सामान व स्टिल बाबत विचारपुस केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली मात्र त्यास न्यायालयात हजर करुन आज  पोलीस कस्टडी रिमांड घेवुन त्यास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्यातील फसवणुक झालेले 3,07,895 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले 

त्यांचे अजुन एका साथीदार वामन कचरु पवार रा नाशिक याचा शोध अकोले पोलीस घेत आहे. सदर मुख्य आरोपी अशोक मगन मोहीते हा फसवणुक करणारा सराईत आरोपी असुन त्याचेवर  विविध पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे. 

——–

आरोपीवर सहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्यांची नोंद

1 मुंबई नाका पो स्टे नाशिक गुरनं 376/2017 भा.द.वि कलम 420,465,468,471,34

2 म्हसरुळ पो स्टे नाशिक  गुरनं भादवि 143,147,149,323,452,34

3 दिंडोरी पो स्टे नाशिक  गुरनं 255/2020 भा.द.वि. कलम 420,323,504,506,34

4 आडगाव पो स्टे नाशिक  गुरनं 155/2018 नार्कोटीक्स ड्रग्स कलम 8(सी)20(सी), 22,25,29 

5 गंगापुर पो स्टे  Negotiable instruments act 138 प्रमाणे 

6 अकोले पो स्टे अ.नगर  गुरनं 515/2022 भा.द.वि कलम 420,467,468,34 अशा प्रकारचे विविध गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नोंद आहेत

“”””””

नागरिकांना तसेच व्यापारी वर्गास याव्दारे सुचित करण्यात येते की, आपण एखाद्या वस्तुची विक्री करताना त्याचे संदर्भात आपली फसवणुक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ऑनलाईन फसवणुक संदर्भात अनोळखी व्यक्तीला मोबाईल फोनवर आपले बँक डिटेल्स व वैयक्तीक माहिती कुणालाही देवु नये तसेच आपले मोबाईल फोनवर आलेला वन टाईम पासवर्ड हा कुणालाही अनोळखी व्यक्तीस देवु नये असे आवाहन अकोले पोलिसांनी केले आहे

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला  व . अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर  व  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सातव  यांचे मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनि भुषण हांडोरे, महिला पोउपनि फराहनाज पटेल, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ आहेर, पोना  बाबासाहेब बडे,  पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ सुयोग भारती,पोकॉ कुलदिप पर्बत,पोकॉ विजय आगलावे पोकॉ आत्माराम पवार व मा. अपर पोलीस अधिक्षक  यांचे कार्यालयाकडील पोना फुरकान शेख यांनी केली असुन पुढील तपास  अकोले पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button