अकोले नगरपंचायतीला विकास कामांसाठी भरघोस निधी देणार

शिंदे – फडणवीस सरकार आल्याने
लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या!
– खासदार सदाशिव लोखंडे
अकोले /प्रतिनिधी
राज्यात सत्ता बदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यामुळे लोकांच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडेच नगरविकास खाते असल्यामुळे अकोले नगरपंचायतीला भरघोस निधी मिळवून देण्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर खासदार लोखंडे आज प्रथमच अकोलेत आले.तेंव्हा त्यांच्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते,शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे,जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख एकनाथ यादव,तालुका प्रमुख संजय वाकचौरे, शहराध्यक्ष गणेश कानवडे, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे, शहराध्यक्ष दिनेश फटांगरे, मनसे चे तालुका प्रमुख दत्ता नवले,माजी जि प सदस्य रमेश शेंगाळ, माजी सदस्या सौ.सुषमा दराडे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अकोले नगरपंचायतीच्या वतीने त्यांचा नगराध्यक्षा सोनाली ताई नाईकवाडी,उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, आरोग्य सभापती शरद नवले, पाणीपुरवठा सभापती हितेश कुंभार बांधकाम सभापती सौ.वैष्णवी धुमाळ,महिला बालकल्याण समिती सभापती प्रतिभा मनकर,नगरसेवक नवनाथ शेटे, विजय पवार,सागर चौधरी,नगरसेविका सौ शितल वैद्य,सौ.तमन्ना शेख,सौ.जनाबाई मोहिते,भाजपचे शहराध्यक्ष सचिन शेटे,परशराम शेळके, अमोल वैद्य ,रवींद्र शेणकर,मोसीन शेख,नवनाथ मोहिते आदींनी त्यांचा सत्कार केला.यावेळी तालुक्यातुन आलेल्या विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खासदार लोखंडे यांचा सत्कार केला व त्यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
अकोले नगरपंचायत अंतर्गत योग भवनासाठी 80 लाख रुपये,चौक सुशोभीकरनासाठी 80 लाख,रस्त्यांसाठी 40 लाख असा 2 कोटी रुपयांचा निधी खासदार लोखंडे यांचे मार्फत प्राप्त झाला आहे.आगामी काळात नगरपंचायतीने विकास आराखडा बनवून पाठवावा त्यासाठी आपण केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे
अकोलेत शक्ती प्रदर्शन
- खासदार म्हणून केलेल्या विविध कामांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.अकोले पर्यंत येतांना रस्त्यात ठीकठिकाणी खासदार लोखंडे यांचे स्वागत करण्यात आले.त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मोठे शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
अकोले नगरपंचायतीच्या प्रभाग 9 च्या नगरसेविका सौ.शितल अमोल वैद्य यांनी अकोले नगरपंचायत हद्दीतील महालक्ष्मी कमान ते खंडोबा माळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दुतर्फा मोठ्या गटारी कराव्यात , यासह प्रभाग 9 च्या अनेक विकास कामांसाठी निधीची मागणी एका निवेदनाद्वारे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कडे यावेळी केली.या कामांसाठी विशेषतः रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही खासदार लोखंडे यांनी दिले.


