इतर

पट्टा किल्ल्यावर सिदोजीनाईक निंबाळकर यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी शिवप्रेमींचा वज्रमूठ!

ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी शिवराष्ट्र परिवाराचा पुढाकार!

संजय उकिरडे /पट्टा किल्ला (विश्रामगड) : महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगड (जि. अहिल्यानगर) येथे सिदोजीनाईक निंबाळकर यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या उद्देशाने शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र आणि आधार फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने इतिहास जतन करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथून झाली. यावेळी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे उपस्थित होते.


त्यानंतर ऐतिहासिक पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगड येथे सिदोजीनाईक निंबाळकर यांच्या समाधीचे पूजन करण्यात आले. यावेळी इतिहास व्याख्याते भूपाल शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती दिली. सिदोजी नाईक निंबाळकर यांचे वंशज शार्दुल आणि शंतनु निंबाळकर त्यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले.


यानंतर इतिहास अभ्यासक दीपक कर्पे सर यांनी या परिसराचा रोमांचकारी इतिहास उपस्थितांसमोर उलगडला. त्यांच्या इतिहास कथनातून उपस्थितांना या भूमीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सिदोजीनाईक यांच्या बलिदानाची माहिती मिळाली.
काळाच्या ओघात दुर्लक्षित होत चाललेल्या या शूरवीराच्या समाधीचे जतन व्हावे, त्यांचा पराक्रम आणि बलिदान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उदात्त हेतूने समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला आहे.
इतिहास केवळ पुस्तकांमध्ये वाचण्यापुरता मर्यादित न राहता ऐतिहासिक वास्तू, समाधीस्थळे आणि शौर्यगाथांच्या माध्यमातून जिवंत राहिला पाहिजे. याच विचारातून शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र आणि आधार फाऊंडेशन यांनी उचललेले हे पाऊल ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या दृष्टीने निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, दीपकराव कर्पे सर, डॉ. महादेव अरगडे, संतोष शेळके, सुखदेव इल्हे, भूपाल शेळके, बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब वैद्य, डॉ. रवी साबळे, बाळासाहेब पिंगळी, नंदकुमार राहणे, पंढरीनाथ घुले, सेवानिवृत्त वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे, सागर कोळगे, बन्सी मदने, सुभाष घनदाट यांच्यासह अनेक शिवप्रेमी व इतिहासप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button