पिंपळगाव खांड धरणाची उंची वाढविण्या बाबत विचार करू – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अकोले (प्रतिनिधी)
पिंपळगाव खांड धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्याला जलसंपदा विभाग प्राधान्य देणार असून,धरणाची उंची वाढविण्याबाबत सर्व्हेक्षणांंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
कोतुळ येथै वरद विनायक देवस्थान ट्रस्ट आणि प्रवरा मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व.अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमास विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक किशोर निर्मळ,विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण,भाजपचे प्रदेश प्रवक्ते व जिल्ह्याचे प्रभारी लक्ष्मण सावजी, माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पा.गायकर, ज्येष्ठ नेते सीताराम देशमुख , बाळासाहेब देशमुख, शिवाजी धुमाळ, बी. जे. देशमुख, अशोकराव देशमुख, रावसाहेब वाकचौरे, श्रीमती सुनिताताई भांगरे, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख, राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, वाल्मिक नवले,देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप भाटे, अगस्ती देवस्थान चे अध्यक्ष अॅड. के. डी. धुमाळ, विश्वस्त दिपक महाराज देशमुख, स्व.भाऊ दाजी प्रतिष्ठान चे सचिव रविंद्र देशमुख, अरुण शेळके, राजेंद्र देशमुख,सुरेश देशमुख, बाळासाहेब वडजे, अमोल वैद्य,विजय पवार, बबलू धुमाळ,तुकाराम गोर्डे, बाळासाहेब मुळे,किशोर टेके, गणेश धुमाळ,नामदेव पिचड, डॉ. मनोज मोरे, अर्जुन गावडे,खंडू बाबा वाकचौरे,निलेश गायकर, धनंजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, वाल्मिक देशमुख,रेश्मा गोडसे, विद्या परशुरामी, गोकुळ वाघ,सुनिल गिते, सचिन गिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अकोले तालुक्याने केलेल्या त्यागामुळे अहील्यानगरचे नंदनवन झाले यामध्ये कोणताही संदेह नाही.स्व.मधुकरराव पिचड यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेमुळे निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लागला.पहील्या वीस किलोमीटर अंतरावरील कालव्यांची काम झाली नसती तर अद्यापही जिरायती भागाला पाणी मिळू शकले नसते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारचा आहे.दुष्काळ हा भुतकाळ करायचा असल्याने जलसंपदा विभागाने दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मुळा आणि प्रवरा खोर्यात वळवून प्रकल्पात अतिरीक्त पाणी निर्माण करण्याचे काम सुरू झाले आहे.या सर्व्हेक्षणासाठी २००कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला.सुमारे ९१ टक्के पाणी उपलब्ध होईल आशी माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
धामणगाव पाट येथील के.टी.वेअरचे रूपांतर बॅरेजेस मध्ये करण्यासाठी ४०कोटी रूपयांच्या निधीस लवकरच मान्यता देण्यात येणार असून,आंबीत धरणाबाबतही लवकरच निर्णय करण्याचे त्यांनी आश्वासीत केले.उच्चस्तरीय डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.
भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवी करीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने या भागात मोठ्या संख्येने पर्यटक यावेत.रोजगाराची निर्मिती यामाध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
वरदविनायक ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक करून मंत्री विखे यांनी आशा शिबीराच्या माध्यमातून सामान्य माणसाला उपचाराचे मार्गदर्शन होवू शकते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेतून सुमारे पाच लाख रुपया पर्यतच्या उपचारांची मुभा दिली असल्याचे सांगितले.केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी कर्क रोगावरील औषधांच्या किमतींवर आणलेल्या नियंत्रणामुळे सामान्य रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यामातून नागरीकांना आरोग्यकवच मिळाल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
शासनाच्या आरोग्य योजनांची माहीती सामान्य माणसाला समजावे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णालयाबाहेर माहीतीचे फलक लावण्याची सूचना त्यांनी केली.लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी आदिवासी समाजाला आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.उपचारांची आधुनिक साधन निर्माण करून प्रवरा मेडीकल ट्रस्ट नेहमीच आरोग्यसेवेत पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.


