इतर

कुक्कुटपालन,व्यवसायातील कंपन्यांची मनमानी थांबविण्यासाठी कठोर कायदा करा. – अनिल खामकर

हिवाळी अधिवेशनात निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पुणे प्रतिनिधी

कुक्कुटपालन व्यवसायातील कंपन्यांची मनमानी आणि शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी कठोर कायदा करावा. येत्या हिवाळी अधिवेशनात याबाबत
निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा.संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल खामकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक १५ नोव्हेंबर रोजी पुनावळे येथील हॉटेल तोरणा येथे झाली.

या बैठकीत पशुपालक आणि कुक्कुटपालक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शासनाने पशुपालकांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत; मात्र त्यापैकी काही निर्णयांचीच अंमलबजावणी झाली असून, अनेक निर्णय अद्याप कागदावरच असल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पशुशेडची पशुसंवर्धन विभागाकडे नोंदणी केल्यानंतर वीजबिल सवलतीचा लाभ मिळत आहे. आवश्यक माहिती पूर्णपणे सादर केलेल्या काही शेतकऱ्यांना या सवलतीचा
लाभ सुरू झाला आहे. मात्र, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही तातडीने सवलत मिळावी,अशी मागणी बैठकीत करण्यात आली.

शासन निर्णय असूनही स्वतंत्र कायदा नसल्याने कंपन्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी कुक्कुटपालन
व्यवसायासंदर्भात कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यासाठी हिवाळी अधिवेशनात निर्णय व्हावा, याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे श्री अनिल खामकर यांनी सांगितले . गरज पडल्यास
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी न्यायालयीन लढाही उभारण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील पशुपालकांनी स्थानिक आमदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदन द्यावे. तसेच हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर आवाज उठविण्याची मागणी करावी.अशा सूचना त्यांनी पसाधिकाऱ्यांना दिल्या
हिवाळी अधिवेशनात शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. वारंवार निवेदने आणि पाठपुरावा
करूनही प्रश्न सुटले नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला.

यावेळी सोनबा गोपाळे (संघटक),बाळासाहेब देशमुख (सहसंघटक) अनिलजी खामकर (अध्यक्ष),विलास साळवी (सचिव) ,प्रकाश लसणे (खजिनदार), दीपक पाटील ( कोकण विभाग),नंदकुमार चौधरी ( पश्चिम महाराष्ट्र),पंढरीनाथ सावळे ( मराठवाडा), शरद गोडांबे ( पश्चिम महाराष्ट्र),सर्जेराव भोसले (उत्तर महाराष्ट्र)
किशोर गोवारी ( मुंबई),संतोष इंगळे कार्याध्यक्ष,राजाराम गजरे (सहसचिव) सचिन परभणे (संपर्कप्रमुख), मनोज दासगावकर ( रायगड),सुभाष केदारी ( पुणे)
तानाजी घाडगे ( सोलापूर),योगेश पाटील ( पालघर),गणेश झावरे ( अहिल्यानगर ) योगेश्वर अस्वले ( सांगली),सुरेश पाटील ( ठाणे),सुनील धुरी ( सिंधुदुर्ग),खतेज पारगावकर ( सातारा),संजय सावंत (संपर्कप्रमुख कोकण विभाग ),एकनाथ गाडे ज्ञानेश्वर माकुणे, अनुभाई शेख,

तान्हाजी शेळके, सचिन घोलप, कैलास थटार किशोर मांडे, भोर बाबा आदी राज्यभरातून अनेक पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी उपस्थित होते

,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button