सत्कर्म आणि निस्वार्थ सेवेतूनच सुंदर जगाची निर्मिती शक्य – राजीव शर्मा

नाशिक प्रतिनिधी
आपले कार्य केवळ आपल्या स्वतःच्या प्रगती पुरते मर्यादित न ठेवता जी व्यक्ती समाजासाठी निस्वार्थ भावनेने चांगले काम करते त्यामुळेच समाजाचा व देशाचा विकास होत असतो .आज अशाच निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची देशाला आवश्यकता आहे ,असे प्रतिपादन रोटरी क्लबचे पीडीजे .राजीव शर्मा यांनी केले . ते रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित सत्कर्म आणि निस्वार्थ सेवेतूनच सुंदर जगाची निर्मिती शक्य या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख होत्या.
राजीव शर्मा पुढे म्हणाले, की छोट्या-छोट्या सत्कर्मांमधून समाजावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो आणि त्यातूनच एक सुंदर जग निर्माण होत असते .आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण स्वतःच्या ध्येयामागे, पैशामागे धावत आहे. मात्र, खरा आनंद हा दुसऱ्यांना वेळ ,ज्ञान व आधार देऊन मदत करण्यात आणि समाजसेवा करण्यात आहे. आपण केलेले छोटेसे चांगले कार्य एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. म्हणून तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत रचनात्मक कामांत पुढाकार घेतला, तर समाजात मोठा सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वासही त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे व कबीरांच्या दोह्याद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांनी केले . सूत्रसंचालन उर्मी दिनानी यांनी केले आणि ऋषिकेश सम्मनवार यांनी आभार मानले.
व्याख्यानाला दिलीप बेनिवाल, अनिल सुकेनकर, मकरंद चिंधडे ,विजय दीनानी, सुजाता राजेबहाद्दर ,पराग जोशी ,किरण भंडारी, किरण वाघ, रोहित देशपांडे ,प्रणाली देशपांडे, दत्ता नवले ,भूषण अमृतकर ,पौर्णिमा सराफ, रेखा पटवर्धन ,शशिकांत पारख, मनीष चिंधडे, गौरव सामनेरकर ,विनायक देवधर आदी उपस्थित होते.


