श्री कोतुळेश्वर देवस्थान येथे कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा उत्सवानिमित्त भव्य दिपोत्सव सोहळ्याचे आयोजन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ब वर्ग तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर देवस्थान येथे कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमा उत्सवानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा भव्य दिपोत्सव सोहळा, आयोजित केला आहे मंगळवार दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं. ६.०० वा. सुरु होणाऱ्या या सोहळ्यात
सायं. ५.३० ते ६.३० वा. :- कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा हरिपाठ कार्यक्रम होईल
सायं. ७ ते ८.३० वा. :- संगीत भजन ( नादब्रम्ह संगित विद्यालय, कोतूळ च्या वतीने
गुणीजन गायक, वादक यांचा सुमधूर भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ८.३० वा :- गंगा महाआरती, दिपदान व त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे
या कार्यक्रमात या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कोतूळेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे


