कोतूळ जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

कोतुळ प्रतिनिधी
वीस वर्षांपूर्वी शाळेतून बाहेर पडलेले चिमुरडे पुन्हा प्राथमिक शाळेत आले आणि संगीत खुर्ची, गाणे, उखाणे,स्नेहभोजन घेत.
एकमेकांच्या सुखदुःखाच्या गप्पागोष्टी मध्ये रंगत जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील बालपणात रमले मात्र बालपणातील हे विद्यार्थी आज विद्यार्थी नव्हते तर शेती, नोकरीं उद्योग व्यवसाया, ची जबाबदार सांभाळणारे
25 ते 40 वर्ष वयो गटातील विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिक होते
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सन 2006 च्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकसान शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बुधाजी कचरे होते
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सुनील बनोटे प्रा. मच्छिन्द्र देशमुख, ,श्री. मोहन वाल्हेकर श्री.कोंडाजी देशमुख, पत्रकार सुनील गीते श्रीम.साळवे मॅडम श्रीम. कडलग मॅडम,श्रीम. क्षीरसागर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
या प्रसंगी प्रशिक सोनवणे , जिशान शेख, जैद पठाण, स्वप्निल कोते, सार्थक गीते, चेतन वाघमारे, संकेत पोखरकर, राजश्री देशमुख , तृप्ती देशमुख, प्रशांत गोडे, अभिषेक मेंगाळ, वैभव देशमुख, या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले

प्रशिक सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर जैद पठाण यांनी आभार मानले
अनेक वर्षानंतर एकमेकांच्या भेटी झालेले बालपणातील विद्यार्थी एकत्र आल्याचा आनंद यावेळी दिसून आला शाळा आणि गुरुजनांच्या प्रति आदर व्यक्त करत या माजी विद्यार्थ्यांनी आपले जीवन प्रवासातील अनुभव एकमेकांना शेअर करत स्नेहमेळ्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतुळ

( बॅच 2006) च्या वतीने शाळेतील भौतिक सुविधांची व्यवस्था व शैक्षणिक साहित्याची मदत शाळेला करण्याचा निर्णय यावेळी या बॅच च्या विद्यार्थ्यांनी घेतला
अस्पायर फाउंडेशन चे वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री मोहन वाल्हेकर यांचा व 2006 या बॅचचा विद्यार्थी अभिषेक मेंगाळ, श्री स्वप्नील, बोऱ्हाडे, दर्शन बोऱ्हाडे हे शासकीय सेवेत रुजू झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला


