इतर

अशोकनगर, निपाणी वडगाव येथे ऊसतोड कामगारांसोबत दिवाळीचा आनंद साजरा!

अँकर असोसिएशन, व सोशल सर्व्हिस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

वडाळा महादेव (प्रतिनिधी) :


दिवाळी हा आनंद, उत्साह आणि माणुसकीचा सण आहे. समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा आनंद घेता यावा, या उदात्त सामाजिक भावनेतून अँकर असोसिएशन, श्रीरामपूर आणि सोशल सर्व्हिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर व निपाणी वडगाव परिसरातील ऊसतोड कामगारांसाठी दिवाळी फराळ व नवीन वस्त्रवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ऊसतोड कामगार आपल्या कष्टाच्या जोरावर साखर उद्योगाला मोठे योगदान देतात. मात्र, वर्षभर राबणाऱ्या या कष्टकरी बांधवांना सणासुदीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही जाणीव ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी दिवाळी फराळ व नवीन वस्त्रांचे वाटप करण्यात आले. कामगारांसोबत दिवाळी साजरी करीत उपस्थितांनी माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अॅड. आदिनाथ जोशी यांनी केले. अध्यक्षस्थानी सलीमखान पठाण होते. यावेळी प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ. संगीताताई फासाटे, प्रा. लक्ष्मण कोल्हे, सोशल सर्व्हिस फाउंडेशनचे अध्यक्ष व उपक्रमाचे प्रवर्तक सूरज सूर्यवंशी, प्रा. बबनराव तागड, यादव करपे, योगेश अभंग, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, योगेश आरंगळे, अवधूत कुलकर्णी, विलास कुलकर्णी, संतोष मते, प्रदीप आहेर, प्राचार्य भाऊसाहेब भवार, शिवाजीराव बारगळ, ह.भ.प. गोरक्षनाथ शिंदे, सुहास गोरे, रामपाल पांडे, गणेश पिंगळे, दत्तात्रय जायभाय,डॉ. प्रमोद गाढे, डॉ. तौफिक शेख, डॉ. सतीश भट्ड आणि हर्षल पाटील राजेन्द्र देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमासाठी किशोर आण्णा निर्मळ तसेच कृष्णा कलेक्शन यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी एमपीएससी परीक्षेची तयारी करणारे युवा प्रज्वल ढाकणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ऊसतोड कामगार आसाराम वारे यांचेही या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.


कष्टकरी ऊसतोड कामगारांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविणारा हा उपक्रम केवळ फराळ व वस्त्रवाटपापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकोपा, माणुसकी, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रेरणादायी आदर्श ठरला. समाजातील वंचित आणि कष्टकरी घटकांसोबत सण साजरा करण्याची ही भावना निश्चितच कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकीची ज्योत अधिक उजळत असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button