अकोले तालुक्यातील अवैध दारू,जुगार मटका बंद करा – विजय पवार
अकोले प्रतिनिधी
दीपावली च्या पार्शव भूमीवर अकोले तालुक्यातील तालुक्यातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी अकोले तालुका आरपीआयचे युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
अकोले तालुक्यातील राजुरपोलीस स्टेशनं आणि अकोले पोलीस स्टेशन अंतर्गत अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे
उत्पादन शुल्क व पोलीस खाते केवळ कारवाईचा बडगा दाखवतात मात्र कारवाईनंतर पुन्हा त्या ठिकाणी अवैध दारू जुगार, मटका, व्यवसाय सुरू होतो खेड्यापाड्यांमध्ये सुरू असलेल्या या अवैद्य व्यवसायामुळे बेरोजगार तरुणांची मोठी संख्या जुगार, मटका, दारू या व्यसनांच्या आहारी जातं आहे यामुळे गावातील गावातील सामाजिक व कौटुंबिक वातावरण दूषित होत आहे अकोले व राजुर पोलीस पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असणाऱ्या अवैध व्यवसायांवर धाडी टाकण्याची केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते. या कारवाया कारवाई होण्यापूर्वीच संबंधितांना याची कल्पना दिली जाते आणि संगमने मताने केवळ तकलादू कारवाई करण्यात येते अशा प्रकारच्या कारवायांमुळे अवैद्य व्यावसायिकांमध्ये मुजोरी वाढत चालली आहे
पोलीस तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या एकमेकांच्या हातात हात घालून सुरू असणारे हे व्यवसाय तातडीने बंद करावे दिवाळीमध्ये या अवैध व्यवसायामुळे दिवाळीत सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी कातडीने या व्यवसायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आर.पी.आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
======



