इतर

कातकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप .”

पुणे ( भोर ) : आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र , पुणे आणि न्यू आदिम आनंद यात्री ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “कातकरी बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप .”
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील चेलाडी , कासुर्डी , वडगाव डाळ आदी सुमारे पुढील 300 कुटुंबांना दिवाळी निमित्त सुमारे 300 kg लाडूचे वाटप करण्यात आले .

या विभागात दिवाळी फराळ वाटपाचे हे 13 वे वर्ष आहे ..
केवळ दिवाळी निमित्त फराळ वाटप करणे हा एकमेव उद्देश्य नसून कातकरी समाजाचे शिक्षण , आरोग्य , रोजगार आणि निवास ह्या बाबींचा समावेश आहे . महाराष्ट्रात कातकरी , कोलाम आणि माडिया गोंड या आदिम जमाती असून सुद्धा त्यांना अद्यापही प्राथमिक शिक्षण , आरोग्य , निवारा आणि निवासासाठी जागा व घरे उपलब्ध नाहीत हि दुर्दैवाची बाब आहे . सरकारी योजना व घोषणा त्यांच्या कानांवर जात नाहीत . हा समुदाय जो पर्यंत वरील प्राथमिक गरजा पूर्ण करू शकणार नाही तो पर्यंत ” विकसित भारत -2047 ” च्या घोषणेला काहीच अर्थ उरणार नाही ..
चेलाडी , कासुर्डी , वडगाव डाळ ,टिटेघर , माकोशी ,आंबवडे , नाझरे , करंजे ,नाटंबी , भट्टी ,शिरवली , पिराचा माळ आदी कातकरी वस्त्यांवरील 60% लोकांना अद्यापही स्वतःच्या मालकीचे घर , जागा , शेती उपलब्ध नसून शिक्षण , आरोग्य आणि इतर भौतिक सुविधा कोसो दूर आहेत ..
या वस्त्या प्रामुख्याने नदीच्या किनारी , ओढ्याच्या कडेला अथवा धरण क्षेत्राच्या परिसरात स्थिरावल्या आहेत . त्यांचे प्रमुख उदर निर्वाहाचे साधन ” मासेमारी ” आहे .. मासेमारीचे ठेके यांना मिळत नाहीत , त्यामुळे हे लोक त्यांच्याकडे मजुरीवर काम करत आहेत . या व्यतिरिक्त शेतीवर , वीटभट्टीवर मजुरी करून जीवन जगत आहेत ..शिक्षणाचं प्रमाण नाहीच .. जे कुणी 8 वि ते 10 वि पर्यंत शिकले आहेत , तेही अल्प वयात लग्न करून बसले आहेत . दारूचे व्यसन पाचवीला पुजले आहे .अशा परिस्थितीमधे विकास साधने दुराप्रस्त आहे ..
वरील वस्थ्यांपैकी वडगाव डाळ आणि करंजे येथील वस्थ्यांचा सुमारे 40 % विकास झाल्याचे दिसून येत आहे . याचे महत्वाचे कारण म्हणजे प्राथमिक शिक्षण , रोजगार , संघटन , स्थानिक संस्था तशेच प्रकल्प अधिकारी , घोडेगांव आणि आदिवासी समाज कृती समिती , पुणे यांचा पुढाकार आहे .. या ठिकाणी 25-30 घरकुलांचे सुंदर असे काम झाले असून अंतर्गत रस्ते आणि कातकरी कुटुंबांचे एकंदरीत मत परिवर्तन होऊन विकासाच्या वाटेवर आरूढ झाल्याचे दिसून येत आहे . Ya वस्तीचा महाराष्ट्रातील इतर कातकरी समुदायाने विचार करावा असे आम्हांस वाटते ..
पुढील वर्षात चेलाडी आणि कासुर्डी या वस्त्यांचा विकास करण्याचे आमचे प्रयत्न आहेत . या वर्षी दुष्काळ असल्याने नद्या , ओढ्यास पाणी नाही , धरणात पाणी कमी आहे , त्यामुळे कातकरी समाजांस या वर्षी मजुरीचे कोणतेही साधन नाही . अनेकांना रेशन कार्ड नाहीत , सबब रेशनही मिळणार नाही , अनेक कुटुंबांनी सावकार , बँक यांचेकडून छोटी कर्जे काढली आहेत , त्यास किमान वसुलीबाबत मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे ..अशा परिस्थीती मध्ये स्थानिक प्रशासन आणि प्रकल्प कार्यालयाने या समुदायाचा या वर्षीचा दुष्काळ सुसह्य कसा होईल या बद्दल आवश्यक ती उपाय योजना करणेत यावी अशी मागणी आम्ही करत आहोत ..


या दिवाळीच्या मुहूर्त्वावर ” कातकरी बांधवांना फराळ वाटप ” कार्यक्रमासाठी वरील दोन्ही संस्थांचे पदाधिकारी नामदेव गंभिरे , किसन भोजने , चिंतामण भुरकुंडे , खेवजी भोईर .गंगाराम सांगडे , लक्ष्मण भालेकर , सुदाम चपटे , राजेंद्र रेंगडे , बाळासाहेब रेंगडे , बबन कोकाटे , सुभाष मते , संजय केदारी , ज्ञानेश्वर बुरुड , पांडुरंग भालिंगे , सुभाष भवारी , धुंदा मोरे , दिनकर शैलकदें , गंगाराम शेखरें , गोविंद जंगले , धुंदाजी किरवे , गोविंद झंजारे , विलास नवाळी , धनंजय रावते आणि शांताराम शिंगाडे सौ अशा शेखरें , कृष्णा भालचीम , रंगनाथ डगळे , प्रशांत शिंगाडे , सतीश लेंभे , प्रदीप आंबवणे यांच्या सहकार्याने हा गोड कार्यक्रम उत्साहात पार पडला आहे

नामदेव गंभिरे

अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती , महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button