आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०२/११/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक ११ शके १९४८
दिनांक :- ०२/११/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५५,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १३:११,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति २७:४७,
योग :- शुभ समाप्ति १२:०७,
करण :- तैतिल समाप्ति २४:३०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:५६ ते ०९:२१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३० ते ०७:५७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०४ ते ०४:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:२९ ते ०५:५५ पर्यंत,
❀ दिन विशेष:
नवमी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ११ शके १९४८
दिनांक = ०२/११/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
नोकरीत बढती मिळण्याची शक्यता असून करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम काळ आहे. चंद्र चतुर्थ भावात आणि गुरु पंचम भावात असल्याने आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. नवीन व्यवसाय करार करताना सावधगिरी बाळगा.
वृषभ
कामात सातत्य ठेवा, वरिष्ठांकडून तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवहार किंवा करार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा.
मिथुन
व्यवसायात प्रगती होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाच्या नवीन संधी समोर येतील. घरात पाहुण्यांची ये-जा वाढेल आणि मन प्रसन्न राहील.
कर्क
नोकरी व व्यवसायात प्रगतीचे योग असून समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. आजच्या दिवशी कामात नियोजन आणि संयम ठेवणे गरजेचे आहे.
सिंह
वाद-विवाटांपासून दूर राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील. मानसिक शांततेसाठी सूर्योपासना किंवा आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करा.
कन्या
आपली मेहनत सुरू ठेवा, कामात यश मिळेल. जुन्या कर्जातून किंवा आर्थिक विवंचनेतून काहीसा दिलासा मिळू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ
सकारात्मक विचारसरणी ठेवून दिवसाची सुरुवात करा. आर्थिक बाजू साधी ठीक राहील, परंतु अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मन थोडे चिंताग्रस्त राहू शकते, त्यामुळे शांत राहा.
वृश्चिक
योजनाबद्ध पद्धतीने काम केल्यास उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल आणि खर्चाला आकाडा ठेवावा लागेल. प्रेमसंबंधांमध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
धनु
तरुणांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. प्रेमजीवनात आनंदाचे आगमन होईल.
मकर
कोर्ट-कचेरी किंवा कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो; पैशांचा वापर विचारपूर्वक करा. जोडीदाराशी क्षुल्ललक कारणांवरून वाद टाळा.
कुंभ
सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभाग वाढेल; सहकाऱ्यांच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्रगतीचे मार्ग उघडे असून उत्पन्न चांगले राहील. कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना विचार करा.
मीन
नोकरीत प्रगतीची शक्यता आहे; कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक आर्थिक बाबतीत दिवस सामान्य जाईल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान किंवा नामस्मरण करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



