इतर

डॉ सुभाष सोमण यांना राज्यस्तरीय आरोग्यदूत पुरस्कार !

            

अकोले प्रतिनिधी

वैद्यकीय पदवीचे उच्च शिक्षण घेऊन ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात तब्बल 56 वर्ष अविरत आरोग्य सेवा करणाऱ्या कोतुळ तालुका अकोले येथील जिल्हा अहिल्यानगर येथील डॉ. सुभाष केशव सोमण यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आरोग्यदूत सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व आपल्या कर्तृत्वाने समाजापुढे आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगर येथे करण्यात आले होते यावेळी राज्यभरातील ग्रामविकास,शिक्षण, आरोग्य,सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

वयाच्या 80 व्या वर्षी ही सेवाभावाने वैद्यकीय सेवा देण्यारे डॉ. सोमण यांच्या उत्तुंग कामगिरीचा आणि समाजहितार्थ असलेल्या संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करून त्यांना राज्यस्तरीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला

जेष्ठ समाज सेवक यादवराव पावसे पाटील,सरपंच सेवा संघांचे संस्थापक नेते बाबासाहेब पावसे पाटील, रवींद्र पवार, प्रवीण महामुनी रवींद्र पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला

आरोग्य दूत पुरस्काराने डॉ. सोमन यांचा गौरव करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button