नेप्ती येथील नारायण औटी यांचे निधन

अहिल्यानगर प्रतिनिधी
-नगर तालुक्यातील नेप्ती येथील नारायण सिताराम औटी (देवा) वय ८० वर्षे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने नेप्ती परिसरासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
नारायण औटी हे परिसरात ‘नारायण देवा’ या नावाने परिचित होते. त्यांनी अनेक वर्षे पुरोहित म्हणून धार्मिक विधी व पौरोहित्याचे कार्य केले. या माध्यमातून त्यांचे पंचक्रोशीतील अनेक कुटुंबांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. धार्मिक कार्यातील त्यांचे योगदान आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी अश्विनी औटी, पुतणे अभिजीत औटी, अक्षय औटी व अमोल औटी, सुना, जावा तसेच नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने औटी कुटुंबावर शोककळा पसरली असून, परिसरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


