इतर

भंडारदरा धरण शताब्दी  महोत्सवा निमित्ताने घाटघरला दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन

अकोले, प्रतिनिधी :

  आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय तथा भंडारदरा धरण (विल्समचे डॅम) शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भंडारदरा धरणाच्या परिसरात घाटघर येथे निसर्ग संवर्धन जैव विविधता आणि शाश्वत पर्यटनावर मंथन करणारे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी दिली

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारे दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन १४ व १५ नोव्हेंबर रोजी घाटघर,इको सिटी–भंडारदरा, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथे होणार आहे.
शनिवार दिनांक 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी दहा वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहेत संमेलनात तर रविवार दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी आठ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे दोन दिवसाच्या संमेलनात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत

पर्यावरण संवर्धनासोबतच जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

समाजसेवक पद्मश्री अण्णासाहेब हजारे, बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे, लिज्जत पापड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते हे या १४ व १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाला प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी निसर्ग  व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र चे अध्यक्ष  प्रमोद मोरे,चंद्रकांत आडे, कृष्णा भवर, नामदेव गंभीरे,चंद्रकांत शिंदे, अनिल पवार, संतोष जगधने, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

घाटघर-भंडारदरा परिसर हा सह्याद्रीच्या निसर्गसंपदेने समृद्ध असून या परिसरातील वनसंपदा, जलस्रोत, जैवविविधता आणि निसर्गसौंदर्याचे संवर्धन करताना पर्यटनाचा शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर संमेलनात विचारमंथन होणार आहे.

वनविभाग, पर्यटन क्षेत्र, स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे, प्लास्टिक प्रदूषण रोखणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि स्थानिक नागरिकांचा पर्यावरण संवर्धनातील सहभाग वाढविणे, या विषयांवर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून चर्चा होणार आहे.

१४ व १५ नोव्हेंबर रोजी घाटघर-भंडारदरा येथे होणारे हे संमेलन पर्यावरण संवर्धनासोबतच सह्याद्रीच्या निसर्गसंपदेचे संरक्षण, जबाबदार पर्यटन आणि स्थानिक सहभाग यांना व्यापक दिशा देणारे ठरणार असून राज्यातील पर्यावरणप्रेमींसाठी विचारांची आणि कृतीची नवी दिशा देणारे व्यासपीठ ठरणार असल्याचे कार्याध्यक्ष व  अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष श्री रामनाथ भोजने यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button