शोध ग्रामीण भागातील रवींद्र सैंदोरे ‘रियल कृषी हिरो ‘चा आदर्शवत : – प्रमोदभाऊ टाके

श्रीरामपूर (वार्ताहर ) मांजरी येथील शेतकरी रवींद्र संतराम सैंदोरे यांनी शेतीला दुग्ध व्यवसाय, कुक्कटपालन इत्यादी जोडधंद्याची जोड देऊन आदर्श शेतीचा निर्माण केला, ते ग्रामीण भागातील कृषी रियल हिरो असल्याचे गौरवोद्गार ब्रिडिंग तज्ज्ञ व दूध उद्योजक प्रमोदभाऊ टाके यांनी काढले.
मांजरी येथील सैंदोरे शेती वस्तीवर प्रमोदभाऊ टाके यांनी ग्रेट भेट देऊन शेतकरी रवींद्र सैंदोरे यांच्या शेती, दूध व्यवसाय पाहणी व मुलाखत प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तज्ज्ञ दूध उद्योजक समीरभाऊ रोकडे, ज्येष्ठ मार्गदर्शक व दूध उद्योजक बाबासाहेब पवार आदी मान्यवरांनी या उपक्रमात भाग घेतला. यावेळी सैंदोरे वस्तीवरील अनेक शेतकरी स्त्रीपुरुष उपस्थित होते.
बाबासाहेब पवार म्हणाले, कष्टाला जर अभ्यासाची जोड मिळाली तर शेती आणि दुग्ध व्यवसाय हा केवळ जगण्याचे साधन न राहता समृद्धीचा महामार्ग बनतो, हा आदर्श रवींद्र सैंदोरे यांच्या शेतीची कृषी युवकांनी पाहणी करावी असे आवाहन केले. समीरभाऊ रोकडे म्हणाले, रवींद्र सैंदोरे यांच्या गोठ्यात ४५ गाईंचे अत्यंत नियोजनबद्ध संगोपन केले जात आहे. आनंदी आणि आदर्श गृहस्थाश्रम पाहण्यास मिळतो. त्यांच्या परिवारातील त्यांचे वडील स्व. संतराम सैंदोरे यांनी मोठ्या कष्टाने शेती केली. आई श्रीमती चंद्रकला सैंदोरे यांनी मनापासून संसार व शेतीची सेवा केली, करीत आहे. पत्नी सौ. ज्योती सैंदोरे, बंधू मेजर पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सैंदोरे, वहिनी प्रा. सौ. पल्लवी सैंदोरे, मुले कु. मानसी सैंदोरे, मुलगा कृष्णा सैंदोरे, पुतणे श्रीराम, कु. आराध्या, कु. धनश्री आदी सर्वच या व्यवसायात सहकार्य करतात, त्यामुळे हा जोडधंदा प्रगतीपथावर असल्याची माहिती रवींद्र सैंदोरे यांनी दिली.
रवींद्र सैंदोरे हे नवीन दूध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सल्ला देतात. व्यवसायात त्यांच्याकडून होणाऱ्या चुका आणि अडीचणी समजून घेऊन योग्य मार्गदर्शन करतात, गेल्या २५ वर्षापासून त्यांनी सखोल अभ्यास करून अनुभव आणि प्रचंड इच्छाशक्ती असलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा पंचक्रोशीत आदर केला जातो. प्रमोदभाऊ टाक म्हणाले, रवींद्र सैंदोरे यांनी आपली १८ एकर बागायती शेती उत्तम रीतीने सांभाळात, दुग्ध व्यवसायात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ पारंपरिक पद्धतीने दूध न काढता त्यांनी ब्रिडिंग (पैदास ), फिडिंग (चारा व्यवस्थापन ) आणि मॅनेजमेंट (एकूण व्यवस्थापन ) या त्रिसूत्रीचा त्यांनी उत्तम अभ्यास केला, जे जे नवे तंत्रज्ञान ते समजून घेतात, प्रसारमाध्यमांद्वारे ज्ञान उपक्रमात आणतात, अशी शेती व व्यवसायाची जोड दिली तरच शेतकरी संपन्न होईल, हा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा असे आवाहन प्रमोदभाऊ टाक यांनी केले. रवींद्र सैंदोरे यांनी दूध तज्ज्ञ, उद्योजक यांचा सन्मान करून आभार मानले.



