इतर

निसर्ग व पर्यावरण वाचविण्या साठी सह्याद्रीतील विनाशकारी प्रकल्प थांबवा; पदमश्री राहीबाई पोपरें

अकोले प्रतिनिधी

भगवान बिरसा मुंडा व आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांची जयंती आणि भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून घाटघर इकोसिटी येथे १० वे निसर्ग व सामाजिक पर्यावरण संमेलन पार पडले.

या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी राज्यातील जंगलतोड तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. आदिवासींचे अस्तित्व धोक्यात आणणारे
विनाशकारी प्रकल्प सह्याद्रीत राबवू नयेत,. असे म्हटले औपचारिक शिक्षण नसतानाही निसर्ग आणि मातीशी जोडलेल्या नाळेमुळेच आपल्याला सन्मान मिळाल्याचे पोपरे यांनी विषद केले.संमेलनाचे उद्घाटन लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते यांच्या हस्ते झाले.

प्रमुख पाहुण्या समाजसेविका हेमलताताई पिचड
यांनी दिवंगत मधुकरराव पिचड यांच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
राजूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या दहा वर्षांच्या काळात महिलांना संघटित करून मोर्चे काढणे, ग्रामसभेत ठराव करणे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून राजूरसह अकोले तालुक्यात दारूबंदी कशी घडवून आणली, याचे अनुभव त्यांनी मांडले.

निसर्ग हा आपोआप वाढतो, निसर्गाची संवर्धन करा निसर्ग हा माणसाला देत राहतो मात्र आपल्याकडून काहीही घेत नाही निसर्गाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्याचे संवर्धन व जतन करण्याची गरज असल्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेशराव कोते यांनी यावेळी सांगितले

सीएसआर प्रमुख संतोष जगधने यांनी जलसंधारण व उत्खननाचे धोके यावर विश्लेषण केले.

संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी हे पर्यावरण संमेलन राज्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला, तर उपाध्यक्ष रामनाथ भोजने यांनी ‘उलगुलान’ आणि भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. या संमेलनाला पुष्पलताताई लहामटे, कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, सचिव वनश्रीताई मोरे- गुणवरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब डोंगरे, इंजि. नामदेव गंभीरे, रानकवी तुकाराम धांडे, कार्याध्यक्ष महेश पाडेकर, दत्तू भोईर, बाळासाहेब ढोले,संजय उकिरडे, विलास तुपे,बाळासाहेब गाडेकर, सुनील गिते,वनक्षेत्र अधिकारी रूपेश गावित, वनपाल शंकर लांडे, वनरक्षक , विलास घोडे, संघटक दिगंबर नवाळी, अमोल चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते सचिन देशमुख, नारायण जगधने, सतीश नेहे, किसन पिचड, प्रा. डॉ. नानासाहेब गोफणे, रोटरी क्लब अध्यक्ष सुनील घुले, बाळासाहेब कडू यांच्यासह राज्यभरातून आलेले पर्यावरणप्रेमी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले, तर आभार महेश पाडेकर व विजय पांडे यांनी मानले.

या संमेलनात सह्याद्रीच्या कन्या पद्मश्री राईबाई पोपेरे, हेमलताताई मधुकराव पिचड, सौ.पुष्पाताई किरण लहामटे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

घाटकर येथे झालेल्या निसर्ग सामाजिक पर्यावरण संमेलनामध्ये सह्याद्री वृत्तदिप या मासिकाचा प्रकाशन सोहळा पार पडला

सह्याद्री हे मासिक निसर्गातील व ग्रामीण भागातील जनतेच्या कल्याणासाठी अविरत लिखाण करत आहे संपादक रामनाथ भोजने यांनी अतिशय उत्कृष्टपणे लेखन करून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रेमींना एक संदेश दिलेला आहे

भंडारदरा धरणाच्या शंभराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण इतिहास जनतेसमोर मांडलेला आहे तसेच भारतीय संविधान व पर्यावरण याशिवाय देशाला पर्याय नाही असा अग्रलेख लिहून एक जबरदस्त प्रबोधन केलेला आहे त्याबद्दल सर्व पर्यावरण प्रेमाने बोलणे यांचं अभिनंदन केलं आहे

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आगी लावण्याचे प्रमाण वाढत चाललेले आहे ते कमी करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे पर्यावरण संवर्धन आणि जैविक संपत्ती यांचे रक्षण होणे तसेच पशुपक्षी प्राणी यांच्या जीवाला धोका पोहोचू नये अशी काळजी सर्व सह्याद्रीत राहणाऱ्या माणसांनी घेतली पाहिजे माणूस म्हणून जगण्याचा आपण सर्व प्रयत्न करा असा संदेश प्रमोद दादा मोरे यांनी आपल्या भाषणातून दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button