इतर

कोतूळेश्वर विद्यालयात ४० वर्षांनंतर बालपणीचे विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील कोतुळेश्वर विद्यालयाच्या सन १९८६-८७ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ४० वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देत चाळीस वर्षानंतर बालपणी चे मित्र एकमेकांना भेटले

‘पुन्हा एकदा शाळेतल्या जुन्या आठवणींना उजाळा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चार दशकांनंतर झालेल्या या भेटीमुळे शाळेतील मित्र-मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि जुन्या दिवसांचा आनंद पुन्हा अनुभवता आला. यावेळी शाळेतील गणवेश मित्रांसोबत रस्त्यावर फिरणे, डोक्यावर पांढरी टोपी, खाकी हाफ चड्डी आणि पांढरा हाफ शर्ट अशा बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले.

आज हे विद्यार्थी उद्योग व्यवसाय, शेती
शिक्षण, सामाजिक कार्य, अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे एकमेकांचे अनुभव, विचार आणि कार्यक्षेत्रातील संधी यांची देवाणघेवाण होऊन भविष्यातही परस्परांना सहकार्य करण्याचे व्यासपीठ निर्माण करण्याच्या भावना यावेळी
उपस्थितांनी व्यक्त केल्या .

यावेळी प्राचार्य जिजाराम गोडे , माजी
प्राचार्य भागवत देशमुख ,पत्रकार सुनील गिते
शांताराम देशमुख,बुधा नाडेकर,चांगदेव डोंगरे,
मालती सोनुले,शोभा देशमुख, सलीम पठाण,
बुधाजी गंभीरे, मनेश देशमुख,बाळासाहेब गंभीरे, बाळासाहेब देशमुख, निवृत्ती देशमुख,बाळासाहेब साबळे ,यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील आठवणी सांगत यापुढे शाळेच्या विकासासाठी व एकमेकांच्या सुख दुःखा साठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला

यावेळी मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.शेवटी सर्वानी एकत्र स्नेहभोजन घेऊन एकमेकांचा निरोप घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button