पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची ग्रामस्थांची मागणी
अकोले /प्रतिनिधी
तालुक्यातील कोतुळ मध्ये अवैध धंदे बंद होणार तरी कधी ? पोलिसांचा धाक नेमका कोणाला ? असा संतप्त सवाल सध्या कोतुळ ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. कोतुळ आणि परिसरात सध्या अवैध व्यवसायाला सुगीचे दिवस
आले असून दारुबंदी उत्पादन शूल्क विभागासह पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप
ग्रामस्थांमधून होत आहे. कोतुळ गावात अवैध दारू विक्री, बनावट दारू, जुगार अड्डे आणि मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप
ग्रामस्थांकडून केला जात आहे. या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य
धोक्यात आले असून, संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकांमध्ये
निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व प्रकार
पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने अवैध व्यावसायिकांचे धाडस वाढले आहे की काय!,
असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. गावातील अनेक अल्पवयीन आणि तरुण मुले दारू, जुगार
आणि मटक्याच्या आहारी जात असल्याची चिंता माता-भगिनी व्यक्त करत आहेत. कंष्टाने
कमावलेला पैसा जुगार आणि मटक्यात जात असल्याने अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक संकट निर्माण
होत आहे. घरातील तरुण मुले व्यसनाधीन होत असताना त्यांच्या भविष्याचे काय, असा सवाल
पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
दारू विक्री, जुगार आणि मटक्याविरोधात कोतुळ पोलीस दूरक्षेत्रात तक्रारी केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, तक्रारदारांची माहिती संबंधित
अवैध व्यावसायिकांपर्यंत पोहोचत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे तक्रार
केल्यानंतर आपले नाव उघड होईल किंवा त्रास सहन करावा
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी गावातील अवैध दारू विक्री आणि कथित बनावट दारूच्या ठिकाणांची तपासणी करावी.जुगार अड्डे आणि मटका व्यवसायावर कठोर कारवाई करावी, कोतुळ
पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करावी. तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्याची व्यवस्था करावी, अवैध धंद्यांना
संरक्षण देणारे कोणी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
लागेल, या भीतीने अनेक नागरिक पोलीस ठाण्याकडे जाण्यासही धजावत नसल्याचे सांगितले जात आहे. काही पोलीस कर्मचारी अवैध व्यावसायिकांशी जवळीक ठेवत असल्याचे तसेच त्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचे आरोप ग्रामस्थांकडून केले जात आहेत. या आरोपांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी
करणे आवश्यक आहे. कोतुलात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचा पोलीस दूरक्षेत्रातील कथित वावर
आणि नागरिकांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण
झाले आहे. अवैध दारू विक्रेते, जुगार चालक आणि मटका व्यावसायिकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप खरा की
खोटा, याचा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच करायला हवा. पोलीस कर्मचारी आणि अवैध
व्यावसायिक यांच्यातील कथित संबंधांचीही चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.



