श्री भगवान विद्यालय भगवानगड येथे पत्रकार दिन साजरा!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी असलेली श्री भगवान विद्यालय भगवानगड येथील विद्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस साजरा केला
जांभेकरांनी दर्पण हे पहिले वृत्तपत्र ची सुरुवात याच दिवशी केली होती त्याच अनुषंगाने त्यांना वृत्तपत्रातला जनक म्हणून संबोधले गेले आहे त्यांची हि आठवण म्हणून प्रत्येक वर्षी ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो

मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री संत भगवान बाबा व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली पत्रकार दिनाचे औचित्य साधून भगवान विद्यालयांमध्ये खरवंडी कासार येथील भगवानगड प्रेस क्लब च्या कृष्णानाथ अंदुरे, सतीश जगताप, दादासाहेब खेडकर, शैलेंद्र जायभाये, अशोक आव्हाड, महादेव बटुळे, अमोल होरणे, अरविंद सांगळे, सतीश जाधव ,नितीन अंदुरे, आदी सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला
यावेळी बोलताना सभापती गोकुळ दौंड म्हणाले की आजच्या काळातील पत्रकरिता कशा पद्धतीने केली पाहिजे सामाजिक राजकीय शैक्षणिक त्याच्यातील सर्व प्रकारचा अभ्यास करून पत्रकारांच्या अंगी कसे गुण असावेत अशा सर्व बाबी विषयी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले
व भगवान विद्यालयातील मुलांची गैरसोय पाहता स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत पाच लाख रुपयाचा निधी स्वच्छतागृहासाठी पंचायत समिती मार्फत देण्याचे जाहीर केले
. पाथर्डी येथे राष्ट्रवादीचे नेते अॅड प्रताप काका ढाकणे मित्र मंडळ यांच्याकडूनही पाथर्डी तालुक्यातील सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले
खरवंडी येथील श्री संत नागेबाबा पतसंस्था यांचेकडून ही पत्रकारांना सन्मानित करण्यात आले
त्यानंतर भारजवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान नगर या ठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी हनुमान नगर शाळेच्या लहान चिमुकल्यांनी पत्रकारांची मुलाखत घेत आणि प्रश्नांचा भडिमार केला सायंकाळी देवनाथ फाऊंडेशनचे डॉ.ज्ञानेश्वर दराडे व कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर दौंड यांच्याकडूनही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला
यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती गोकुळ भाऊ दौंड यांनी भूषवले
यावेळी भगवान विद्यालयात खरवंडी चे सरपंच प्रदीप पाटील, मुख्याध्यापक सुनील अंदुरे सर, ढाकणवाडी चे उपसरपंच सुनील ढाकणे ,सुरेश थोरात ,आण्णा वारे, अनिल खंडागळे, स्वामिनी किर्तने मॅडम, सुरेश सारूक, संतोष कुलकर्णी, गणेश आंधळे, बाळासाहेब गर्कळ, माऊली उगलमुगले आदी मान्यवर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन एन टी शिरसाठ सर व आभार बाबासाहेब अंदुरे सर यांनी मानले