भाऊराव वाईकर यांची कौटुंबिक न्यायालयात प्रबंधक (रजिस्ट्रार) या पदावर पदोन्नती

अकोले प्रतिनिधी–
अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक भाऊराव वाईकर यांची कौटुंबिक न्यायालयात प्रबंधक (रजिस्ट्रार) या पदावर पदोन्नती झाली असून जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक न्यायालयातील प्रबंधक हे पद रिक्तच होते. यासंदर्भात कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर च्या पदाधिकारी यांनी यापुर्वीच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांची भेट घेतली होती आणि फॅमिली कोर्ट ला प्रबंधक व दोन बेलीफ द्यावेत अशी मागणी होती. त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे.
प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सौ नेत्राजी कंक यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. वाईकर यांचा अतिशय कार्यक्षम कर्मचारी म्हणून नावलौकिक आहे. यापूर्वी त्यांनी जिल्हा न्यायालयात अगदी ज्युनियर क्लार्क ते अधिक्षक पदापर्यंत काम केले आहे. नवीन प्रबंधक म्हणून कौटुंबिक न्यायालयात आपला कार्यभार घेतल्या नंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे
. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, उपाध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव कचरे, कार्याध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. अनिताताई दिघे, सह सचिव ॲड. अर्चनाताई शेलोत, खजिनदार ॲड. राजेश कावरे, सदस्य ॲड. एम. बी. अंबेकर, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. शिवाजी सांगळे, ॲड. अनुराधाताई येवले, ॲड. सुचिताताई बाबर, ॲड करूणा शिंदे मॅडम, ॲड. सत्यजीत कराळे, कौटुंबिक न्यायालयाचे अधिक्षक जी.डी.जोशी आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
मा.रमेशराव उर्फ भाऊराव वाईकर यांनी अकोले मध्ये अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केली त्यांचा अतिशय कार्यक्षम अधिकारी म्हणून नावलौकिक आहे.त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे अकोले मध्ये त्यांचा जिवाभावाचा मोठा मित्र परिवार आहे.श्री वाईकर यांची पहिली नेमणूक कनिष्ठ लिपिक म्हणून दिवाणी न्यायालय वरीष्ट स्तर अहमदनगर येथे दि.1.6.1985 रोजी झालेली असुन व पहिली पदोन्नति वरीष्ट लिपिक म्हणून दि 1.6.1989 रोजी जामखेड न्यायालयात झाली. व त्या नंतर दुसरी पदोन्नति सहाय्यक अधिक्षक म्हणून दि 1.11.2011 रोजी अकोले न्यायालयात झाली. त्या नंतर तिसरी पदोन्नति अधीक्षक म्हणून दि. 3.6.2019 रोजी राहाता येथे दिवाणी न्यायालय वरीष्ट स्तर येथे झाली.व आता चौथी पदोन्नति प्रबंधक म्हणून दि. 21.7.2022 रोजी कौटुंबिक न्यायालय अहमदनगर येथे झाली. त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फलित झाल्याचे पाहून सर्व मित्र परिवाराने समाधान व्यक्त केले व त्यांच्या या पदोन्नती बद्दल अभिनंदन केले .